human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ - Rayat Samachar

human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
75 / 100

ग्रंथपरिचय | ३० ऑगस्ट

Origins of the Caste System हे प्रख्यात संशोधक व साहित्यिक संजय सोनवणी यांचे संशोधनात्मक पुस्तक जातीव्यवस्थेच्या वास्तव इतिहासावर लख्ख प्रकाशझोत टाकते. भारतीय उपखंडातील human जातीव्यवस्था हा जागतिक समुदायाच्या आकर्षणाचा आणि टीकेचा विषय बनून गेला आहे. जातीव्यवस्था हजारो वर्षांपूर्वीपासून कठोर आणि अपरिवर्तनीय असल्याचे दावे सारे जातीघटक तर करतातच पण विद्वानही त्याला अपवाद राहिलेले नाहीत. जातनिर्मुलनाचे स्वप्न अनेक पुरोगामी विचारवंत पाहत असतात, त्या दिशेने प्रयत्न करत असतात पण त्यात समाधानकारक म्हणावे असे यश मिळालेले दिसत नाही. अशा स्थितीत जातींचा उगम कसा झाला, त्या कठोर कधीपासून व्हायला लागल्या आणि त्यांचे नेमके स्वरूप काय याचे संशोधन नव्या दृष्टीने होणे आवश्यक होते.

संजय सोनवणी यांच्या Origins of the Caste System या संशोधनात्मक ग्रंथात जातीसंस्थेचा उगमच मुळात कसा झाला आणि तिला आजचे स्वरूप कसे लाभले यावर लख्ख प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. जागतिक विद्वान व वाचकांवर या ग्रंथाचा प्रभाव पडत आहे.

जातीसंस्था ईश्वरदत्त आहे आणि सुरुवातीपासून ती जन्माधारित आणि बंदिस्त व्यवस्था होती, या पारंपारिक मताला हे पुस्तक पूर्ण छेद देते. आजवरच्या विद्वानांची मोठी चूक म्हणजे वैदिक धर्म आणि हिंदू धर्म हे दोन्ही धर्म एकच समजून वैदिकांची वर्णव्यवस्था आणि हिंदूंची जातीसंस्था एकाच समजून केलेले विश्लेषण. मुलाधारच चुकीचा असल्याने जातीसंस्थेबाबत चुकीची गृहीतके निर्माण झाली. संजय सोनवणी यांच्या संशोधनानुसार वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यांच्यात दुरान्वयानेही संबंध नाही. वैदिकांची वर्णव्यवस्था दैवी आणि अपरिवर्तनीय असून हिंदूंची जातीव्यवस्था व्यवसायांतून निर्माण झाली. सन एकहजारपर्यंत व्यवसाय बदलणे, म्हणजे जात बदलणे ही नित्य बाब होती. सन हजारनंतर वैदिक धर्माचा प्रादुर्भाव हिंदू धर्मात होऊ लागला. त्यात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेतून जो तो शक्यतो आपल्याच व्यवसायाला चिकटून राहू लागला. बलुतेदारी पद्धत आल्याने जात अधिकाधिक घट्ट होत गेली.

सोनवणी यांनी इतिहासातील सामान्यांना अपरिचित असलेल्या आणि देशाचा आर्थिक आधार असलेल्या श्रेणीसंस्थेचा इतिहासही आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ दिलेला आहे. धर्मशास्त्र, आर्थिक इतिहास, मानववंशशास्त्र, धर्मेतीहास, राजकीय इतिहास या सर्व ज्ञानशाखांचा विपुल उपयोग करत आपला सिद्धांत प्रबळपणे मांडून जातीसंस्थेच्या अभ्यासकांना आणि सामान्य वाचकांच्या जातीविषयक आकलनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. जातीअंताच्या चळवळीसाठीही हे संशोधन मोलाचे आहे.

या पुस्तकाला डॉ. संजीव सभ्लोक आणि डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याही प्रस्तावना असून त्यांनी सोनवणी यांच्या नव्या दृष्टीकोनाची प्रशंसा केलेली आहे. वैदिक धर्म आणि हिंदू धर्म हे जसे एकाच समजले जातात ते वास्तव नाही उलट दोघांना एक समजल्याने जातीविषयकचे आकलनही कसे चुकत गेले हे समजून घेणे, ही जातीअंताच्या चळवळीची खरी सुरुवात असेल.

जातीसंस्थेच्या सर्व अभ्यासकांनी नक्कीच वाचायला हवे…

• Origins of the Caste System

Published by – Prajakt Prakshan, Pune, Maharashtra

• Whatsapp – 9890956695

कृपया, लेख वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदविणे

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर

 

Share This Article
24 Comments