Ahilyanagar News: आर्थिक वर्षाचे ऑडिट रिपोर्ट दाखल करण्यास ३१ डिसेंबरपर्यन्त मुदतवाढ - Rayat Samachar
Ad image

Ahilyanagar News: आर्थिक वर्षाचे ऑडिट रिपोर्ट दाखल करण्यास ३१ डिसेंबरपर्यन्त मुदतवाढ

धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून परिपत्रक जाहीर; ट्रस्ट कायदा विधीज्ञ ॲड. संतोष गायकवाड यांची माहिती

विश्वस्त संस्थांना दिलासा

अहमदनगर | २५ डिसेंबर | प्रतिनिधी

(Ahilyanagar News) धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणी झालेल्या सर्व विश्वस्त संस्था / ट्रस्ट यांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे ऑडिट रिपोर्ट www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यासाठी ता.३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आल्याबाबतचे परिपत्रक क्र. ६१४/२०२४, ता.२५.११.२०२४ रोजी प्रसिद्ध करून सर्व विश्वस्त संस्थांना कळविले आहे.

Ahilyanagar News
संकेतस्थळ

(Ahilyanagar News) सध्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाची नमूद वेबसाइट तांत्रिक अडचणींमुळे व्यवस्थित व सुरळीत सुरू नसल्यामुळे विश्वस्तांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ही मुदत वाढविल्याचे परिपत्रकात नमूद केले.

 अहमदनगर जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी झालेल्या सर्व ट्रस्टच्या विश्वस्तांनी याची नोंद घेवून ३१.१२.२०२४ च्या आत ‘संकेतस्थळ सुरळीत सुरू झाल्यास’ हिशोबपत्रके जमा करावीत, असे आवाहन ट्रस्ट कायद्याचे विधीज्ञ ॲड. संतोष गायकवाड यांनी केले.

हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment