Mumbai News: अहमदनगर मनपा पुर्वाश्रमीचे जकात ठेकेदार जयकुमार गोरे यांना मिळाले 'ग्रामविकास आणि पंचायती राज' खाते; फडणवीसांच्या प्रस्तावाला सी.पी.राधाकृष्णन यांची मंजूरी - Rayat Samachar
Ad image

Mumbai News: अहमदनगर मनपा पुर्वाश्रमीचे जकात ठेकेदार जयकुमार गोरे यांना मिळाले ‘ग्रामविकास आणि पंचायती राज’ खाते; फडणवीसांच्या प्रस्तावाला सी.पी.राधाकृष्णन यांची मंजूरी

शंभुराजे देसाईंचे स्टेट ‘एक्साईज’ मिळाले अजित पवारांना

मुंबई | २१ डिसेंबर | प्रतिनिधी

(Mumbai News) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना ता.२१ डिसेंबर रोजी मंत्रीमंडळ खातेवाटप प्रस्ताव दिलेला होता. या खातेवाटप प्रस्तावास तात्काळ आजच राज्यपाल यांनी मंजूरी दिली. याबाबतचे पत्र प्रिंसीपल सेक्रेटरी प्रविण दराडे यांनी तात्काळ चिफ सेक्रेटरी सुजाता सौनिक यांना रवाना केले.

 (Mumbai News) यामधे गृह विभागासह महत्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली असून शंभुराजे देसाई यांचे स्टेट एक्साईज म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क (जुने दारूबंदी खाते) अजित पवार यांना दिले. त्याच प्रमाणे अहमदनगर महानगरपालिकेचे पूर्वाश्रमीचे जकात ठेकेदार असलेले जयकुमार गोरे यांना ‘ग्रामविकास आणि पंचायती राज’ खाते देण्यात आले.

उल्लेखनीय बाब म्हणते अत्यंत मलईदार असलेले गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ हे खाते अहमदनगर उत्तरेचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले तसेच महसुल खाते चंद्रकांत बावनकुळे यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्याची जबाबदारी नरहरी झिरवाळ यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
मंजूर मंत्रीमंडळ खातेवाटप :
कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister)
१. चंद्रशेखर बावनकुळे – महसूल.
२. राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ).
३. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण.
४. चंद्रकांत बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री.
५. गिरीश महाजन – विदर्भ, तापी, कोकण विकास, आपत्ती व्यवस्थापन.
६. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा.
७. गणेश नाईक – वन.
८. दादाजी भुसे – शालेय शिक्षण.
९. संजय राठोड – माती व पाणी परीक्षण.
१०. धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण.
११. मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन.
१२. उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा.
१३. जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल.
१४. पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन.
१५. अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय ऊर्जा.
१७. अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय.
१८. शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय.
१८. आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान.
१९. दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय.
२०. अदिती तटकरे – महिला व बालविकास.
२१. शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम.
२२. माणिकराव कोकाटे – कृषी.
२३. जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायती राज.
२४. नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन.
२५. संजय सावकारे – कापड.
२६. संजय शिरसाट – सामाजिक न्याय.
२७. प्रताप सरनाईक – वाहतूक.
२८. भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन.
२९. मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन.
३०. नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे.
३१. आकाश फुंडकर – कामगार.
३२. बाबासाहेब पाटील – सहकार.
३३. प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण.
राज्यमंत्री (State Ministers )
१. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण.
२. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय.
३. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा.
४. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन.
५. योगेश कदम – गृह राज्य (शहर).
६. पंकज भोयर – गृहनिर्माण.Mumbai News

हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment