मुंबई | ५ सप्टेंबर | प्रतिनिधी
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने पुढाकार घेत मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्याचा निर्णय घेतला. राज्यातील अल्पसंख्यांक minority समाजाच्या वतीने तीघांचे आभार मानण्यात येत आहे.
अल्पसंख्याक विकास विभागामार्फत ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना’ सन २०२४-२५ मध्ये राबविण्यात येणार आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसांनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन परिपूर्ण प्रस्ताव मुंबई शहर जिल्हाधिकरी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन शिंदे, फडणवीस, पवार सरकारच्या वतीने मुंबई शहर जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर यांनी केले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा