Leopard: ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करून बिबट्यांचा शोध घ्यावा - राधाकृष्ण विखे पाटील - Rayat Samachar

Leopard: ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करून बिबट्यांचा शोध घ्यावा – राधाकृष्ण विखे पाटील

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
74 / 100

संगमनेर | १५ सप्टेंबर | प्रतिनिधी

तालुक्यातील निमगाव टेंभी येथे Leopard बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या संगीता शिवाजी वर्पे यांच्या कुटुंबीयांची महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेवून सांत्वन केले. त्यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये मदतीचे शासनपत्र सोपवले.

पालकमंत्री विखे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून या परिसरात बिबट्यांचा असलेला वावर आणि याबाबत करावयाच्या उपाय योजनांबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शिरापूर घाटात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याच्या तक्रारी यावेळी ग्रामस्थांनी सांगितल्या. तक्रारींची गांभीर्यपूर्वक दखल घेवून वन विभागाने ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करून बिबट्यांचा शोध घ्यावा. अशा सूचना पालकमंत्री विखे पाटील यावेळी दिल्या.

याप्रसंगी वनाधिकारी धर्मवीर सालविठ्ठल, संगमनेर उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील, संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ
Share This Article
Leave a comment