१० व्या अनुसूचीचे उद्दिष्ट पक्षांतर थांबवणे, हे असले तरी ते पक्षांतरांना प्रोत्साहन देईल असे वर्तन
पणजी | ७ जानेवारी | प्रतिनिधी
(goa news) काँग्रेसच्या आठ आमदारांच्या पक्षांतराला आव्हान देणार अर्ज गोवा विधानसभा सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळल्याने काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. ही याचिका सुनावणीस आली असता पुढील सुनावणी १५ जानेवारीला ठेवण्यात आली आहे.
(goa news) याविषयी बोलताना गिरीश चोडणकर म्हणाले, सभापतींच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. १० व्या अनुसूचीचे उद्दिष्ट पक्षांतर थांबवणे हे असले तरी ते पक्षांतरांना प्रोत्साहन देईल, असे वर्तन सत्ताधारी पक्ष करत आहे. विलीनीकरण मान्य करून आठ आमदारांना कमळ चिन्ह वाटप करण्याच्या चुकीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या प्रकरणाचा निकाल सभापती कसा लावू शकतात, असा सवाल त्यांनी केला. हा आदेश अपेक्षित धर्तीवर होता आणि दहा आमदारांच्या पक्षांतर प्रकरणी मागील सभापतींनी दिलेल्या आदेशाची ही कार्बन कॉपी आहे, असेही ते म्हणाले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदविणे
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर