राहुरी | १३ सप्टेंबर | प्रतिनिधी
Politics महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. अहमदनगर शहरातील व्हीस्टार हॉटेलच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक संपन्न झाली. अमित ठाकरे यांच्या हस्ते राहुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे वितरीत आली.
संदेश पाटोळे, राहुरी तालुकाध्यक्ष. किरण कांबळे, तालुका सचिव. नवनाथ शेंडगे, तालुका उपाध्यक्ष. अनिल गीते, तालुका उपाध्यक्ष. महेंद्र शिरसागर, तालुका उपसचिव. अथर्व कापसे, तालुका उपसचिव. संदेश गायकवाड, राहुरी शहराध्यक्ष. प्रमोद विधाटे, राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष. प्रसाद गुंजाळ, राहुरी शहर उपाध्यक्ष. तोफिक शेख, राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष. प्रसाद लोखंडे, राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष. सौरभ गोडसे, देवळाली प्रवरा विभाग अध्यक्ष. हर्षल भोंगळे, म्हैसगाव युनिट अध्यक्ष. उमेश तमनर, तमनर आखाडा विभाग अध्यक्ष.
पदाधिकाऱ्यांची निवडी मनविसेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष इतर सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडी करण्यात आल्या.
संदेश पाटोळे हे म.न.वि.से चे अत्यंत सक्रिय पदाधिकारी असून त्यांच्या निवडीबद्दल प्रदेशउपाध्यक्ष सुमित वर्मा, आ.राजु पाटील, अविनाश जाधव, मनसे दक्षिण जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, उत्तर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर गाडे, ॲड.बिडवे, राजेश लुटे, नितीन कोल्हापुरे, डॉ.शिरसाठ, अनिल डोळस, भाऊ उंडे, अरुण चव्हाण, ॲड. मुसमाडे, विजय पेरणे, प्रकाश गायकवाड, संकेत लोंढे, सागर माने, प्रतीक विधाते, युवराज पवार आदींनी अभिनंदन केले.
राहुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी म.न.वि.से.च्या माध्यमातून सोडवण्यासाठी मी नेहमी कटिबध्द होतो, यापुढेही असेल असे निवड प्रसंगी संदेश पाटोळे यांनी सांगितले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
येथे कॉमेंट लिहावी