पुणे | ३१ ऑगस्ट | प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ३७-अहमदनगर मतदारसंघाचे Rss Bjp उमेदवार डॉ. सुजय विखेपाटील यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये ‘चेकींग ॲण्ड व्हेरिफीकेशन ऑफ बर्न्ट मेमरी/मायक्रोकन्ट्रोलर ऑफ ईव्हीएम’ बाबत केलेला अर्ज भारत निवडणूक आयोगाने निकाली काढल्याचे एका मराठी वृत्तवाहिनीवर प्रसारित वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसून डॉ. सुजय राधाकृष्ण विखेपाटील यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधील निवडणूक प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात कायदेशिर प्रक्रिया सध्या सुरू असून सदर याचिका अद्याप प्रलंबित आहे.
‘चेकींग ॲण्ड व्हेरिफीकेशन ऑफ बर्न्ट मेमरी/मायक्रोकन्ट्रोलर ऑफ ईव्हीएम’ बाबत मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ जे निर्देश देतील त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा