पुणे | २६ सप्टेंबर | प्रतिनिधी
ahmednagar news येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘पुरुषोत्तम करंडक’ या अत्यंत मानांकित, नावाजलेल्या नाट्यस्पर्धेत तृतीय क्रमांकाच्या सांघीक करंडकावर न्यू आर्टस् चे नाव तिसऱ्यांदा कोरले गेले. या स्पर्धेत पवन पोटे लिखित ‘देखावा’ ही सामाजिक प्रश्नावरील एकांकिका सादर केली होती. मराठी मालिका व मराठी चित्रपटसृष्टीचे प्रवेशद्वार म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. न्यू आर्ट्स ने यापूर्वी देखील दोनदा हा करंडक जिंकलेला आहे. या तृतीय क्रमांकाच्या सांघिक विजेत्या पारितोषकासोबतच या स्पर्धेतील उर्वरित चारही वैयक्तिक पारितोषिके पटकावण्याचा मान महाविद्यालयाने मिळवला आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोगिक लेखक पवन पोटे, उत्तेजनार्थ अभिनय राखी गोरखा, आणि उत्तेजनार्थ दिग्दर्शन ऋषिकेश सकट यांनीही पारितोषिके प्राप्त केली.
न्यू आर्टस् च्या या नेत्रदीपक यशामुळे अहमदनगरच्या नाट्य क्षेत्रात विशेष भर पडली. विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कला मंडळाचे चेअरमन डॉ.नवनाथ येठेकर यांचे मार्गदर्शन लाभले. अ.जि.वि.प्र.समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ.विवेक भापकर, सचिव ॲड.विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत वाघ आणि खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते नाट्य संघाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपप्राचार्य डॉ.अनिल आठरे, डॉ.संजय कळमकर, डॉ.किसन अंबाडे, नाट्यकर्मी डॉ.श्याम शिंदे, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्कारानंतर ‘देखावा’ ही एकांकिका सादर करण्यात आली.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
Contents
पुणे | २६ सप्टेंबर | प्रतिनिधी ahmednagar news येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘पुरुषोत्तम करंडक’ या अत्यंत मानांकित, नावाजलेल्या नाट्यस्पर्धेत तृतीय क्रमांकाच्या सांघीक करंडकावर न्यू आर्टस् चे नाव तिसऱ्यांदा कोरले गेले. या स्पर्धेत पवन पोटे लिखित ‘देखावा’ ही सामाजिक प्रश्नावरील एकांकिका सादर केली होती. मराठी मालिका व मराठी चित्रपटसृष्टीचे प्रवेशद्वार म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. न्यू आर्ट्स ने यापूर्वी देखील दोनदा हा करंडक जिंकलेला आहे. या तृतीय क्रमांकाच्या सांघिक विजेत्या पारितोषकासोबतच या स्पर्धेतील उर्वरित चारही वैयक्तिक पारितोषिके पटकावण्याचा मान महाविद्यालयाने मिळवला आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोगिक लेखक पवन पोटे, उत्तेजनार्थ अभिनय राखी गोरखा, आणि उत्तेजनार्थ दिग्दर्शन ऋषिकेश सकट यांनीही पारितोषिके प्राप्त केली.न्यू आर्टस् च्या या नेत्रदीपक यशामुळे अहमदनगरच्या नाट्य क्षेत्रात विशेष भर पडली. विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कला मंडळाचे चेअरमन डॉ.नवनाथ येठेकर यांचे मार्गदर्शन लाभले. अ.जि.वि.प्र.समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ.विवेक भापकर, सचिव ॲड.विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत वाघ आणि खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते नाट्य संघाचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपप्राचार्य डॉ.अनिल आठरे, डॉ.संजय कळमकर, डॉ.किसन अंबाडे, नाट्यकर्मी डॉ.श्याम शिंदे, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्कारानंतर ‘देखावा’ ही एकांकिका सादर करण्यात आली.हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ