Election: राज्य सरकारची 'योजना' प्रचारासाठी सरकारी खर्चाने 'दूतांची' नेमणूक; १३ सप्टेंबरपर्यंत ‘मुख्यमंत्री योजनादूत’साठी अर्ज करण्याचे आवाहन - Rayat Samachar
Ad image

Election: राज्य सरकारची ‘योजना’ प्रचारासाठी सरकारी खर्चाने ‘दूतांची’ नेमणूक; १३ सप्टेंबरपर्यंत ‘मुख्यमंत्री योजनादूत’साठी अर्ज करण्याचे आवाहन

78 / 100

मुंबई | ६ सप्टेंबर | गुरूदत्त वाकदेकर

राज्यशासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी Election ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम राबविण्यात येणार असून प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक, तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक, अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार. योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाईल. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील, प्रचार करतील.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधारकार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र, सक्षम यंत्रणेने दिलेला अधिवासाचा दाखला. आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो,ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील हमीपत्र नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. ता. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment