अहमदनगर | १३ सप्टेंबर | प्रतिनिधी
Politics आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्याबद्दल पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. शहरात मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी शहरजिल्हाध्यक्ष भरत खाकाळ म्हणाले की, आज खरं म्हणाल तर सत्याचा आणि संविधानाचा विजय झाला. मोदी सरकारने अरविंद केजरीवाल ज्यांनी चांगल्या शाळा बनवल्या. चांगले आरोग्य दिले. दिल्लीतील २ कोटी जनतेला मोफत मेडीसिन दिले. त्यांना जेलमध्ये टाकून त्याच्या मेडीसीन बंद केल्या. आप आणि केजरीवालांना संपवण्याचे काम या सरकारने केले, परंतु आज दिलेल्या निर्णयावरून हे सिद्ध होतंय की सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही. “सत्यमेव जयते” , ” संविधानाचा विजय असो” अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा महासचिव प्रकाश फराटे, शहर महासचिव दिलीप घुले, उपाध्यक्ष संपत मोरे, उपाध्यक्ष अंबादास जाधव, संघटनमंत्री विक्रम क्षिरसागर, शिक्षक आघाडी अध्यक्ष रवी सातपुते, युवा आघाडी अध्यक्ष अनिल साळवे, युवा आघाडी उपाध्यक्ष विजय लोंढे, पर्यावरण आघाडी अध्यक्ष अजित कटारिया आदी सहभागी झाले होते.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा