Postal Tracking: सर्वांना सोबत घेऊन काम करणे हेच खरे कौशल्य - बी.नंदा; नूतन सहायक डाक अधीक्षक रविकुमार झावरे, राजेश नेहरकर यांची नियुक्ती; पोस्टल संघटनेने केला सत्कार - Rayat Samachar
Ad image

postal tracking: सर्वांना सोबत घेऊन काम करणे हेच खरे कौशल्य – बी.नंदा; नूतन सहायक डाक अधीक्षक रविकुमार झावरे, राजेश नेहरकर यांची नियुक्ती; पोस्टल संघटनेने केला सत्कार

55 / 100

अहमदनगर | ११ सप्टेंबर | प्रतिनिधी

येथील डाक विभागाच्या सहायक अधिक्षक उत्तर विभागपदी रविकुमार झावरे तर पश्चिम विभागपदी राजेश नेहरकर यांची नियुक्ती झाली. त्यांनी संदीप हदगल यांच्याकडून पदभार स्वीकारला. झावरे हे श्रीरामपूर तर नेहरकर हे भुसावळ येथे कार्यरत होते. संदीप हदगल यांची श्रीरामपूर विभागात बदली झाली.
नूतन सहायक अधिक्षक रविकुमार झावरे व राजेश नेहुरकर यांचे स्वागत तर संदीप हदगल यांना निरोप असा संयुक्त कार्यक्रम वि.डा.कार्यालयात वरिष्ठ डाक अधिक्षक बी. नंदा. यांच्या अध्यक्षतेखाली तर बाळासाहेब बनकर, अमोल भूमकर यांच्या उपस्थितीत आयोजित केला होता.
यावेळी बी. नंदा यांनी संदीप हदगल यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत, सर्वाना सोबत घेत काम करण्याचे हदगल यांचे विशेष कौशल्य होते. त्याचा पुरेपूर वापर करत त्यांनी उपविभाग सतत पुणे क्षेत्रामध्ये अग्रेसर ठेवला. त्याबद्दल विशेष कौतुक करत पुढील पोस्टिंग करता शुभेच्छा दिल्या. नव्याने विभागात आलेले अधिकारी यांना शुभेच्छा देत आपल्या आगामी कार्यकाळात हदगल यांनी केलेल्या विशेष कामाचे अनुकरण करत विक्रमी कामकाज करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पोस्टल संघटनेचे नेते संतोष यादव यांनी संदीप हदगल यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत, अहमदनगर विभाग सर्वच बाबतीत अग्रेसर ठेवण्यात विशेष योगदान दिल्याबदल मनःपुर्वक धन्यवाद दिले. श्रीरामपूर पोस्टल विभागातसुद्धा कामाचा त्यानी ठसा उमठवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. नव्यानेच विभागात बदलून आलेले रवीकुमार झावरे यांनी यापूर्वी या विभागात काम केलेले असल्याने विभागाची पूर्णतः माहिती आहे. त्यामुळे ते सुद्धा आपला कार्यकाल यशस्वी करतील. आपला कामाचा एक वेगळा ठसा उमठवतील अशी अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. राजेश नेहरकर यांची प्रथमच विभागात नेमणूक असल्याने ते सुद्धा आपला कार्यकाल यशस्वीरित्या पूर्ण करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी बाळासाहेब बनकर, अमोल भूमकर, महेश तामटे, संजय परभने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल काळे, आभार प्रदर्शन तान्हाजी सूर्यवंशी यांनी केले.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

कार्यक्रमास संजय लंके, नामदेव डेंगळे, सुनिल थोरात, आसिफ शेख, देवेन शिंदे, शुभांगी सस्कर, सोमनाथ शिंदे, ऋषिकेश कार्ले, सुनिल भागवत, शिवाजी लांडे, संतोष घुले, सागर पंचारिया, राजेंद्र कोल्हे, युवराज राऊत, पीरमोहम्मद चौगुले, नवनाथ शिंदे, अक्षय शिरसाठ, कैलास माने, रंजना कदम यांच्यासह मोठ्या संख्येने डाक कर्मचारी उपस्थित होते.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

अहमदनगर डाक विभागात सर्वच पदी काम करण्याची संधी मिळाली, त्यायोगे खूप अनुभव मिळाला. सर्वांना सोबत घेऊन काम केल्यामुळे चांगली कामगिरी करता आली. पोस्टाच्या सर्व योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे, तसेच कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही प्राथमिकता राहील. – संदीप हदगल, सहायक डाक अधीक्षक, श्रीरामपूर विभाग

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment