अहिल्यानगर |२२.९ | पंकज गुंदेचा
Anand Jain Pathshala Ahilyanagar: ‘सपना है आनंद गुरुवर का, सुसंस्कारित बालक हो हर घर का’ या संकल्पनेतून तीर्थंकर कॉलनी, अहिल्यानगर येथे आनंद जैन पाठशाळेचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. महाराष्ट्र प्रवर्तक पू. श्री. कुंदनऋषिजी म. सा. आणि संस्कार दिवाकर पू. श्री. आलोकऋषिजी म. सा. यांच्या पावन सान्निध्यात हा कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रसंत आचार्य सम्राट पू. प. श्री. आनंदऋषिजी म. सा. हे १९व्या शतकातील महापुरुष व दीर्घद्रष्टे संत होते. आचार्य भगवंतांनी जैन भागवती दीक्षा ग्रहण केल्यानंतर विविध ठिकाणी जैन पाठशाळा सुरू करून जनहितार्थ कार्याला सुरुवात केली. त्यांचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने आचार्य भगवंतांच्या कृपाशीर्वादाने, महाराष्ट्र प्रवर्तक पू. श्री. कुंदनऋषिजी म. सा. यांच्या सत्प्रेरणेने आणि संस्कार दिवाकर पू. श्री. आलोकऋषिजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद नवकार परिवार ट्रस्टच्या अंतर्गत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आनंद जैन पाठशाळा कार्यरत आहेत.

या पाठशाळांच्या माध्यमातून मुला-मुलींना जैन संस्कार व शिक्षण देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण वाढत असलेल्या वर्तमान परिस्थितीत बालकांमध्ये सुसंस्कार रुजविण्याची नितांत गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी पू. श्री. आलोकऋषिजी म. सा. यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या कॉम्प्युटर आणि स्पर्धेच्या युगात सुसंस्कारांना अतिशय महत्त्व आहे. सुसंस्कारांमुळे पालकांना मुलांच्या भविष्याची चिंता कमी होण्यास मदत होते. राम असो, महावीर असो किंवा श्रीकृष्ण असो, आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांमुळे ते महापुरुष झाले. सुसंस्कारांचे बीजारोपण लहान वयातच होत असते, असे त्यांनी सांगितले.
पू. श्री. कुंदनऋषिजी म. सा. यांनी आपल्या प्रबोधनात सांगितले की, लहान मुलांमध्ये भरपूर क्षमता असून जीवनात खूप काही मिळविण्याची त्यांच्यात संभावना असते. त्यांना सुसंस्कारित करण्याचा विडा पू. श्री. आलोकऋषिजी म. सा. यांनी उचलला आहे. विविध ठिकाणी पाठशाळा सुरू करून धार्मिक, नैतिक आणि सामाजिक संदेश दिला जात आहे. आजचा बालक भविष्यात चांगला नेता आणि चांगला श्रावक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास विनोद गांधी, जवाहर चंगेडिया, संजय गुगळे, प्रकाश छल्लानी, मोहन बरमेचा, संजय बोरा, प्रकाश फिरोदिया, सतीश चंगेडिया, निकिता शिंगवी, श्रुती गांधी, सुप्रिया छल्लानी, मेघा बोरा आणि समता बोरा उपस्थित होते.
ही माहिती आनंद नवकार परिवार ट्रस्टचे सेक्रेटरी श्री. मनोजकुमार शेटीया यांनी दिली.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


