English Medium Satsang: संत निरंकारी मिशन आयोजित इंग्लिश माध्यम सत्संग सोहळा उत्साहात संपन्न - Rayat Samachar

English Medium Satsang: संत निरंकारी मिशन आयोजित इंग्लिश माध्यम सत्संग सोहळा उत्साहात संपन्न

rayatsamachar
3 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

अहिल्यानगर | १६.९ | पंकज गुंदेचा

निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज व निरंकारी राजपिता रमित जी यांच्या कृपाशीर्वादाने निरंकारी मिशनच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीने युवावर्गासाठी झोनस्तरीय English Medium Satsang (EMS) अर्थात इंग्लिश भाषेच्या माध्यमातून आयोजित विशाल सत्संग सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला.

सावेडी रोडवरील संजोग लॉन्सच्या भव्य हॉलमध्ये सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबई येथील प्रचारक महात्मा धीरज मल्होत्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नगर शहर व परिसरासह श्रीरामपूर, शिर्डी, संगमनेर, सोनई, पारनेर, कर्जत, काष्टी, राशीन, जामखेड तसेच अहिल्यानगर झोनमधील बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड येथील युवा संत व साधसंगतचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इंग्रजी या जागतिक भाषेच्या माध्यमातून संत निरंकारी मिशनची Universal Brotherhood ची विचारधारा अधिक व्यापक स्वरूपात युवकांपर्यंत पोहोचविणे हा या English Medium Satsang कार्यक्रमाचा उद्देश होता. यावेळी विविध ठिकाणांहून आलेल्या युवा संतांनी इंग्रजी भाषेत गीत, विचार, मनोगते, समूहगीत, कविता आणि नाटिका आदींच्या माध्यमातून सद्गुरूंची पावन शिकवण तसेच मिशनच्या दैवी मूल्यांचा संदेश उपस्थितांसमोर सादर केला.

- Advertisement -

मुख्य मंचावर विराजमान असलेले प्रचारक महात्मा धीरज मल्होत्रा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पूर्ण सद्गुरूंकडून एक ईश्वर परमात्म्याची ब्रह्मज्ञानाद्वारे ओळख करून घेतलेल्या व्यक्तीचे जीवन धन्य होते आणि त्याच्या मानवी जीवनाचे उद्दिष्ट साध्य होते. पुढे सेवा, सत्संग व सिमरन करीत ब्रह्मज्ञानावर आधारित आदर्श जीवन जगत, सद्गुरूंच्या आदेशाप्रमाणे कर्म करून आपला इहलोक व परलोक नेटका करण्याचा प्रयत्न केला जातो.

English Medium Satsang
संत निरंकारी मिशनच्या वतीने संजोग लॉन्स येथे आयोजित English Medium Satsang मध्ये युवा संतांनी समूहगीत व मनोगत सादर केले. यावेळी युवावर्गासह अबालवृद्ध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(छाया : किशोर खुबचंदानी)

जीवनाचा उद्देश केवळ स्वतःसाठी जगणे नसून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हादेखील आहे, याची जाणीव ब्रह्मज्ञानामुळे होते. ब्रह्मज्ञानामुळे दृष्टी बदलते, कोणताही भेदभाव राहत नाही आणि प्रत्येकामध्ये एकाच निरंकार परमात्म्याचे दर्शन होते, असे त्यांनी सांगितले.

आजच्या युगामध्ये विशेषतः युवकांमध्ये निर्माण झालेली नकारात्मकता आणि एकलकोंडेपणा दूर करण्याचे साधन सत्संग व संतांची विचारधारा आहे. प्रेरणादायी संदेशांमधून युवकांना जीवनाची सुंदर दिशा मिळते. आदर्श जीवनमूल्ये, सकारात्मक विचार, नम्रता, प्रेम आणि एकता या गुणांनी युवकांचे जीवन समृद्ध होते, असेही महात्मा धीरज मल्होत्रा यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा लालवानी व विजय कुंभकर्ण यांनी केले, तर क्षेत्रीय संचालक आनंद कृष्णानी यांनी आभार मानले. सेवादल संचालक अनिल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल सदस्यांनी कार्यक्रमाची सर्व व्यवस्था व नियोजन चोखपणे पार पाडले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading