Ad imageAd image

Religion | आयोध्या राममंदिर गैरव्यवहाराचा आरोप; 1,250 सोन्याचांदीच्या विटा गायब

चंपत रायसह विश्वस्तांवर एफआयआरची मागणी; 'द प्रिंट'च्या वृत्तामुळे खळबळ

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shiradath

अयोध्या | १७.६ | रयत समाचार

(Religion) येथील जगप्रसिध्द श्रीराम मंदिरासाठी आलेल्या देणग्यांच्या व्यवस्थापनाबाबत सुरू असलेल्या वादाला मंगळवारी नवे वळण मिळाले. राम जन्मभूमी आंदोलनातील कार्यकर्ते संतोष दुबे यांनी मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करून एफआयआर नोंदविण्याची मागणी केली.

(Religion) ‘द प्रिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, आर्थिक देणग्यांमधील कथित अनियमिततेच्या आरोपांबरोबरच, राम मंदिर आंदोलनाच्या काळात देणगी स्वरूपात मिळालेल्या सुमारे १,२५० सोन्या, चांदी, हिरेजडित आणि अष्टधातूच्या विटा गायब झाल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला.

(Religion) संतोष दुबे यांच्या म्हणण्यानुसार, या विटांमध्ये मॉरिशसमधून पाठविण्यात आलेली एक विशेष वीट तसेच मुंबईतील एका उद्योगपतीने हिरेजडित स्वरूपात दान केलेली वीट यांचाही समावेश होता. या मौल्यवान देणग्यांचा सध्या कोणताही अधिकृत हिशेब उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणी पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदविलेला नसून, तक्रारीची छाननी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या आरोपांमुळे राम मंदिर ट्रस्टच्या कामकाजाबाबत नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
संदर्भ : The Print मधील प्रशांत श्रीवास्तव यांचा अहवाल


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading