Atharvashirsha Pathan Ahilyanagar: गणेशोत्सवानिमित्त अक्षता बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे २२ सप्टेंबरला सामूहिक अथर्वशीर्ष पठण - Rayat Samachar

Atharvashirsha Pathan Ahilyanagar: गणेशोत्सवानिमित्त अक्षता बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे २२ सप्टेंबरला सामूहिक अथर्वशीर्ष पठण

सर्व गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन

rayatsamachar
1 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

अहिल्यानगर | २०.९ | पंकज गुंदेचा

Atharvashirsha Pathan Ahilyanagar: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अक्षता बहुउद्देशीय प्रतिष्ठान, अहिल्यानगर यांच्या वतीने सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा भक्तिमय उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गणेशभक्तांसाठी मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत ‘अथर्वशीर्ष पठण’ या सामूहिक भक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अक्षता बहुउद्देशीय प्रतिष्ठान, गुजरगल्ली, अहिल्यानगर येथे होणार आहे. ‘बाप्पाच्या चरणी सामूहिक भक्तीचा सोहळा’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Atharvashirsha Pathan Ahilyanagar

- Advertisement -

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून आरोग्य जागृती, सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक भक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.

या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा नागरिकांनी आणि गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रसाद पेटकर आणि सर्व सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading