NAFA Film Festival | अमेरिकेत झळकणार महाराष्ट्राचा 'अधिकृत' मराठी चित्रपट महोत्सव; NAFA सोबत शासनाचा 1 करार - Rayat SamacharNAFA Film Festival अमेरिकेत महाराष्ट्राचा अधिकृत मराठी चित्रपट महोत्सव; NAFA सोबत शासनाचा ऐतिहासिक करार

NAFA Film Festival | अमेरिकेत झळकणार महाराष्ट्राचा ‘अधिकृत’ मराठी चित्रपट महोत्सव; NAFA सोबत शासनाचा 1 करार

NAFA सह मराठी चित्रपटसृष्टीच्या जागतिक विस्ताराला चालना

रयत समाचार वृत्तसेवा
4 Min Read
महाराष्ट्र शासन आणि NAFA यांच्यातील करारामुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या जागतिक विस्ताराला नवी दिशा मिळणारSubEditor | Dipak Shirasath

मुंबई | ३.७ | राम कोंडीलकर

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक मंच मिळवून देण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (फिल्मसिटी) आणि नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (NAFA) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारानुसार अमेरिकेतील प्रतिष्ठित NAFA आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव NAFA Film Festival यापुढे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकृत सहकार्याने आयोजित केला जाणार.

महाराष्ट्र शासन आणि NAFA Film Festival यांच्यात सामंजस्य करार

NAFA Film Festival संदर्भातील शासननिर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असून, महोत्सवासाठी महाराष्ट्र शासन आणि फिल्मसिटीमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच या कराराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक अधिकारही प्रदान करण्यात आलेत.

हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा

- Advertisement -
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते अभिजित घोलप यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेली नफा ही उत्तर अमेरिकेतील मराठी आणि भारतीय चित्रपट, संस्कृती व कलावंतांना जागतिक मंच उपलब्ध करून देणारी स्वयंसेवी, ना-नफा संस्था अर्थात एनजीओ आहे. गेल्या तीन वर्षांत NAFA Film Festival महोत्सवाने उत्तर अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टीची स्वतंत्र आणि प्रतिष्ठित ओळख निर्माण केली.

हे ही पहा : विजय तेंडुलकर लिखित घाशिराम कोतवाल चित्रपट पहा

या करारामुळे नफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला भारताबाहेरील महाराष्ट्र शासनाचा अधिकृत मराठी चित्रपट महोत्सव म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) आणि मुंबई आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट व ॲनिमेशन चित्रपट महोत्सव (MIFF) यांच्या धर्तीवर, परंतु भारताबाहेर आयोजित होणारा महाराष्ट्र शासनाशी संलग्न अधिकृत मराठी चित्रपट महोत्सव म्हणून नफा’ची नवी ओळख निर्माण झाली.
अधिक माहिती देताना नफा’चे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांनी सांगितले, महाराष्ट्र शासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे मराठी चित्रपटसृष्टीसाठी जागतिक स्तरावर नवे दालन खुले झाले. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, सहनिर्मिती, वितरण, OTT व्यासपीठे आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देणे हे नफा’चे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हासे पाटील यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले, मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि राज्यातील कलाकार, तंत्रज्ञ व निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय संधी मिळवून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. नफा सोबतचे हे सहकार्य महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर पोहोचविणारे महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राला होणारे प्रमुख लाभ म्हणजे मराठी चित्रपटांचा उत्तर अमेरिका आणि जागतिक स्तरावर व्यापक प्रचार-प्रसार. आंतरराष्ट्रीय वितरण, OTT प्लॅटफॉर्म आणि नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश. जागतिक वितरक, गुंतवणूकदार आणि चित्रपट महोत्सवांशी थेट संपर्क. नवोदित कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना प्रशिक्षण व नेटवर्किंगची संधी. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आधुनिक चित्रपटनिर्मिती, वितरण आणि मार्केटिंगविषयी जागतिक अनुभव. आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती (Co-production) आणि संयुक्त प्रकल्पांना चालना. मराठी भाषा, संस्कृती आणि कलाविश्वाचा जागतिक स्तरावर प्रभावी प्रचार.
नफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ मध्ये २० ते ३० देशांतील चित्रपट प्रदर्शित होणार असून, चित्रपटनिर्मिती, OTT, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), वितरण, सहनिर्मिती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील परिसंवाद, कार्यशाळा, मास्टरक्लास आणि व्यावसायिक सत्रांचे आयोजन करण्यात येईल.
या ऐतिहासिक भागीदारीमुळे मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक चित्रपट उद्योगाशी जोडणारा दीर्घकालीन दुवा निर्माण होणार असून कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ आणि वितरकांसाठी आंतरराष्ट्रीय संधींचे नवे पर्व सुरू होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading