Sujata Puri PhD | कवयित्री सुजाता पुरी यांची पीएच.डी.ला गवसणी; जिल्हा परिषदेतील महिला शिक्षिकांमध्ये मानाचा बहुमान - Rayat SamacharSujata Puri PhD कवयित्री सुजाता पुरी यांना पीएच.डी.; जिल्हा परिषदेतील महिला शिक्षिकांमध्ये मानाचा बहुमान

Sujata Puri PhD | कवयित्री सुजाता पुरी यांची पीएच.डी.ला गवसणी; जिल्हा परिषदेतील महिला शिक्षिकांमध्ये मानाचा बहुमान

दशनाम गोसावी जातीचे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक अध्ययन

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read

नगर तालुका | ३.७ | सलीमखान पठाण

(Sujata Puri PhD) जिल्हा परिषद मराठी शाळा, पिंपळगाव माळवी येथील उपाध्यापिका तसेच प्रसिद्ध कवयित्री व लेखिका सुजाता नवनाथ पुरी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा

- Advertisement -

 

(Sujata Puri PhD) ‘दशनाम गोसावी जातीचे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक अध्ययन : विशेष संदर्भ अहमदनगर जिल्हा’ या विषयावर त्यांनी संशोधन प्रबंध सादर केला. या संशोधनासाठी अंबाजोगाई महिला महाविद्यालयाचे डॉ. दिलीप मस्के यांनी मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. तसेच मराठवाडा विद्यापीठातील मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण साळोक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा प्रबंध पूर्ण केला.

 

हे ही पहा : RSYT : अडीच हजार वर्षांपूर्वी विटांवर कोरलेल्या ‘सिंह सेनापती’ कादंबरीचा मराठी अनुवाद

 

(Sujata Puri PhD) विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या विद्यमान महिला शिक्षिकांमध्ये पीएच.डी. प्राप्त करणाऱ्या डॉ. सुजाता पुरी या संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव शिक्षिका ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे.

Sujata Puri PhD पीएच.डी. पदवी मिळाल्यानंतर कवयित्री डॉ. सुजाता पुरी यांचा सत्कार

डॉ. पुरी या साहित्य क्षेत्रातही सक्रिय असून त्यांचा ‘ऋतू अंतरीचे’ हा काव्यसंग्रह आणि ‘वाटेवरच्या मशाली’ हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच अखिल भारतीय मराठी कवी संमेलनात सलग चार वर्षे कविता सादर करण्याचा मान त्यांना मिळाला असून, हा बहुमान मिळविणाऱ्या त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव कवयित्री आहेत.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

 

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading