Solar Smart Cycle | वय फक्त 12, पण कमाल मोठी ! भंगारातून तयार केली सौरऊर्जेवर चालणारी स्मार्ट सायकल - Rayat SamacharSolar Smart Cycle १२ वर्षीय अब्दुल्लाहची कमाल! कबाडातून तयार केली सौरऊर्जेवर चालणारी स्मार्ट सायकल

Solar Smart Cycle | वय फक्त 12, पण कमाल मोठी ! भंगारातून तयार केली सौरऊर्जेवर चालणारी स्मार्ट सायकल

अब्दुल्लाह इमरानची अनोखी कामगिरी; केवळ ९ हजारांत साकारला वैज्ञानिक प्रकल्प

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
सोलापूरच्या १२ वर्षीय अब्दुल्लाह इमरानने कबाडातील साहित्य वापरून सौरऊर्जेवर चालणारी स्मार्ट सायकल तयार केलीSubEditor | Dipak Shirasath

सोलापूर | ४.७ | रयत समाचार

ज्या वयात बहुतांश मुले मोबाईल गेम्समध्ये रमलेली असतात, त्या वयात सोलापूर येथील अवघ्या १२ वर्षीय अब्दुल्लाह इमरान याने आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर एक प्रेरणादायी वैज्ञानिक कामगिरी करून दाखवली आहे. केवळ ९ हजार रुपये खर्च करून आणि भंगारातील (स्क्रॅप) साहित्याचा वापर करत त्याने सौरऊर्जेवर चालणारी स्मार्ट सायकल (Solar Smart Cycle) तयार केली.

 

हे ही वाचा : Public issue | तासन्‌तास वीज गेली? ग्राहक नुकसान भरपाई मागू शकतो; महावितरणचे नियम काय सांगतात? 

- Advertisement -

 

Solar Smart Cycle चे वैशिष्ट्य म्हणजे ती थेट सूर्यप्रकाशातून चार्ज होते. तसेच त्यामध्ये GPS ट्रॅकिंग, डिजिटल स्पीडोमीटर आणि व्हॉइस कंट्रोल यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, बॅटरी संपल्यास ही सायकल सामान्य सायकलप्रमाणे पॅडल मारूनही सहज चालवता येते.

Solar Smart Cycle Solapur student Abdullah Imran with his solar-powered smart bicycle made from scrap.

हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अब्दुल्लाहने तब्बल सहा महिने अथक परिश्रम घेतले. मर्यादित साधनसामग्री आणि कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याने साकारलेला हा प्रकल्प अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

 

मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वय, महागडे शिक्षण किंवा भरपूर आर्थिक साधने आवश्यक नसतात; त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि नावीन्यपूर्ण विचारसरणी महत्त्वाची असते, हे अब्दुल्लाह इमरानने आपल्या Solar Smart Cycle कृतीतून सिद्ध करून दाखविले.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading