मुंबई | ४.७ | रयत समाचार
(India Rising Esports) पॅरिस येथे होणाऱ्या ‘ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६’ या जागतिक गेमिंग स्पर्धेसाठी भारतातील युवा गेमर्सना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘इंडिया रायझिंग : रोड टू ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६’ आणि ‘जिओ ब्लास्ट’ या उपक्रमांद्वारे भारताचे दरवाजे जागतिक ई-स्पोर्ट्स स्पर्धांसाठी खुले होत असून, हा भारताच्या डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेच्या वाटचालीतील ऐतिहासिक टप्पा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
(India Rising Esports) मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर, बीकेसी येथे आयोजित कार्यक्रमात उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, जिओ ब्लास्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ली कॉड्रे, ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप फाउंडेशनचे प्रतिनिधी जेम्स कनिंगहॅम, विविध ई-स्पोर्ट्स संघटनांचे प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच देशभरातील गेमर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा
(India Rising Esports) यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रामुळे जागतिक स्तरावर ओळख निर्माण केलेली मुंबई आता ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिएलिटी (AVGC-XR) या नव्या सर्जनशील उद्योगांमध्येही देशाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाली आहे. माहिती तंत्रज्ञान, डिजिटल कौशल्य, उत्कृष्ट शैक्षणिक संस्था, चित्रपटसृष्टी, ओटीटी निर्मिती, पोस्ट-प्रोडक्शन सुविधा आणि सक्षम पायाभूत व्यवस्था यांमुळे महाराष्ट्रात या क्षेत्राची भक्कम परिसंस्था निर्माण झाली.
हे हि वाचा : History | द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
गेमिंग उद्योगाच्या वाढत्या सामर्थ्याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले, जागतिक स्तरावर गेमिंग उद्योगाचा वार्षिक महसूल चित्रपट आणि संगीत उद्योगाच्या एकत्रित महसुलापेक्षाही अधिक झाला आहे. भारतात ५० कोटींहून अधिक सक्रिय गेमर्स असून देशांतर्गत गेमिंग उद्योगाची व्याप्ती सुमारे ४० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे गेमिंग हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून रोजगार, नवोन्मेष, उद्योजकता आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले, व्यापक AVGC-XR धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या धोरणांतर्गत ३,२६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे आणि दोन लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. राज्यभरात १२ AVGC पार्क विकसित करण्यात येत असून या क्षेत्राला उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जाही देण्यात आला आहे.
मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे अत्याधुनिक व्हर्च्युअल प्रोडक्शन व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित रेंडरिंग सुविधा उभारण्यात येणार आहेत. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ५० एकर जागेवर जागतिक दर्जाचे कंटेंट क्रिएटर्स संकुल विकसित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘इंडिया रायझिंग’ आणि ‘जिओ ब्लास्ट’ या उपक्रमांमुळे महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक युवा गेमरला जागतिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागातील गुणवंत युवकांनाही आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा सिद्ध करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



