RTI Rules | माहिती अधिकार कायदा धोक्यात? प्रस्तावित RTI 2026 नियमबदलांवर आज पुण्यात चर्चासत्र - Rayat SamacharRTI Rules माहिती अधिकार कायदा धोक्यात? प्रस्तावित नियमबदलांवर पुण्यात आज चर्चासत्र

RTI Rules | माहिती अधिकार कायदा धोक्यात? प्रस्तावित RTI 2026 नियमबदलांवर आज पुण्यात चर्चासत्र

महेश झगडे, प्रल्हाद कचरे करणार मार्गदर्शन; सजग नागरिक मंचचा पुढाकार

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
माहिती अधिकार कायद्याच्या प्रस्तावित नियमबदलांवर आज पुण्यात सजग नागरिक मंचाचे चर्चासत्रSubEditor | Dipak Shirasath

पुणे | ५.७ | रयत समाचार

माहिती अधिकार (RTI) कायद्याच्या प्रस्तावित नियमबदलांमुळे RTI Rules कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर परिणाम होणार का, तसेच हे बदल माहिती अधिकार कायदा कमकुवत करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे का, याचा सखोल उहापोह करण्यासाठी सजग नागरिक मंच, पुणे यांच्या वतीने आज रविवारी ता. ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा

RTI Rules चर्चासत्र आयएमडीआर कॉलेज सभागृह, बीएमसीसी रोड, पुणे येथे होणार असून ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. माहिती अधिकार कायदा २००५ लागू होऊन दोन दशके पूर्ण झाली आहेत. अलीकडेच महाराष्ट्र शासनाने RTI Rules कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राज्यातील जागृत माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी तात्काळ आंदोलने सुरू केली त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर या नियमांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.

RTI Rules पुण्यात माहिती अधिकार कायद्यावरील चर्चासत्राची घोषणा

- Advertisement -
हे बदल अद्याप रद्द करण्यात आलेले नसून, ते माहिती अधिकार कायद्याच्या मूळ उद्देशालाच बाधा आणणारे असल्याची चिंता विविधस्तरांतून व्यक्त होत आहे.
RTI Rules पार्श्वभूमीवर आयोजित चर्चासत्रात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे माजी प्रधान सचिव महेश झगडे (निवृत्त IAS), निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे आणि माहिती अधिकार विषयाचे अभ्यासक विवेक वेलणकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

प्रस्तावित नियमबदलांची आवश्यकता, त्यामागील भूमिका आणि त्याचे नागरिकांवर होणारे संभाव्य परिणाम यावर या चर्चासत्रात सविस्तर चर्चा होणार आहे.

सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि कार्यकारी विश्वस्त जुगल राठी यांनी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या चर्चासत्रास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर ९८५००६३४८० तसेच जुगल राठी ९३७००६६९३७ यांना संपर्क साधण्याचे कळविले आहे.

Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading