मुंबई | ८.८ | रयत समाचार
(Birth Death Registration) राज्यातील जन्म व मृत्यू नोंदणी व्यवस्था अधिक कार्यक्षम, सुलभ आणि जबाबदार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे. ३१ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र शासन राजपत्रातील (असाधारण भाग चार-अ) अधिसूचनेनुसार राज्यभर विविध विभागांतील अधिकाऱ्यांना जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ अंतर्गत नोंदणी अधिकारी (Registrar of Births and Deaths) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
(Birth Death Registration) या निर्णयामुळे जिल्हा, तालुका, महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत तसेच शासकीय रुग्णालयांमधील जन्म व मृत्यू नोंदणीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुसूत्र होणार आहे.
हे ही वाचा : Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
(Birth Death Registration) कोणत्या अधिकाऱ्यांना मिळाले अधिकार? : राजपत्रानुसार खालील अधिकारी नोंदणी अधिकारी म्हणून कार्य करतील – संचालक (प्राथमिक) आरोग्य सेवा – मुख्य निबंधक. राज्य आरोग्य माहिती व जीवनावश्यक आकडेवारी कार्यालयाचे उपसंचालक – उपमुख्य निबंधक. जिल्हा आरोग्य अधिकारी – जिल्हा निबंधक. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी – अपर जिल्हा निबंधक. महानगरपालिकांचे कार्यकारी आरोग्य अधिकारी. जिल्हा शल्यचिकित्सक. सामान्य, ग्रामीण, उपजिल्हा व महिला रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी. नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी. ग्रामपंचायत अधिकारी. तसेच इतर संबंधित प्रशासकीय अधिकारी.
आरोग्य सेवकांनाही महत्त्वाची जबाबदारी : अधिसूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकांना प्रत्येक जन्म किंवा मृत्यूची माहिती नोंदणी अधिकाऱ्यांकडे देणारे “सूचक” (Notifier) म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नोंदणी प्रक्रिया अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.
जुने आदेश रद्द : शासनाने स्पष्ट केले आहे की, या विषयावरील पूर्वीच्या सर्व अधिसूचना, आदेश आणि निर्देश रद्द करून ही नवीन अधिसूचना लागू करण्यात आली.
🚨 मोठी बातमी | महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय
राज्यात जन्म व मृत्यू नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल! विविध विभागांतील अधिकाऱ्यांना नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती; प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकांना ‘सूचक’ म्हणून जबाबदारी.
#Maharashtra #BirthRegistration #DeathRegistration #PublicHealth #GovernmentResolution #RayatSamachar
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


