Modi Script Expert | 30 मोडी लिपीतज्ञ समितीवर डॉ. राजेश बाराते; शैक्षणिक क्षेत्राला मानाचा तुरा - Rayat SamacharModi Script Expert महाराष्ट्र शासनाच्या मोडी लिपीतज्ञ समितीवर डॉ. राजेश बाराते यांची नियुक्ती

Modi Script Expert | 30 मोडी लिपीतज्ञ समितीवर डॉ. राजेश बाराते; शैक्षणिक क्षेत्राला मानाचा तुरा

मोडी अभ्यासकांच्या नामिकेत समावेश; ऐतिहासिक अभिलेखांच्या लिप्यंतराची महत्त्वाची जबाबदारी

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
महाराष्ट्र शासनाच्या मोडी लिपीतज्ञ समितीवर नियुक्त झाल्यानंतर डॉ. राजेश बाराते यांचे अभिनंदन करण्यात आले.SubEditor | Dipak Shirasath

श्रीगोंदा | ४.७ | माधव बनसुडे

(Modi Script Expert) श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. राजेश बाराते यांची महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या शासकीय मोडी लिपीतज्ञ समितीवर नियुक्ती झाल्याने श्रीगोंदा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांनी समाधान व्यक्त करत, “डॉ. बाराते यांची शासनाच्या समितीवर झालेली नियुक्ती ही संस्थेसह संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे गौरवोद्गार काढले.

 

(Modi Script Expert) महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने ता.२७ मे २०२६ रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील शासकीय अभिलेखांचे जतन, अभ्यास आणि लिप्यंतर करण्यासाठी राज्यस्तरीय मोडी लिपी अभ्यासकांची नामिका तयार करण्यात आली आहे. या नामिकेत राज्यभरातून निवड करण्यात आलेल्या ३० अभ्यासकांमध्ये डॉ. राजेश बाराते यांचा समावेश करण्यात आला.

हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा

- Advertisement -
(Modi Script Expert) श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर दिला जात असून विद्यार्थ्यांना मोडी लिपीचे प्रशिक्षणही दिले जाते. इतिहास विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. बाराते यांनी मोडी लिपीचा सखोल अभ्यास करून त्यात विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्याची दखल घेत शासनाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.

 

या समितीच्या माध्यमातून डॉ. बाराते हे महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील प्रशासकीय, महसूल, कायदेविषयक, शैक्षणिक, अभियांत्रिकी तसेच ऐतिहासिक अभिलेखांतील मोडी लिपीतील कागदपत्रांचे मराठी लिप्यंतर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणार आहेत. त्यामुळे राज्यातील ऐतिहासिक दस्तऐवजांचे संवर्धन आणि संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे.
गेल्या १३ वर्षांपासून इतिहास विषयाचे अध्यापन करणारे डॉ. बाराते यांनी अनेक विद्यार्थ्यांना इतिहास आणि मोडी लिपीचे प्रशिक्षण देत संशोधनाची प्रेरणा दिली आहे. त्यांच्या या यशामुळे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. बाराते यांच्या नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, मार्गदर्शक अनुराधाताई नागवडे, प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, विश्वस्त प्रा. सुरेश रसाळ, निरीक्षक सचिन लगड तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Crime | रस्ता ‘चोरी’ला गेला ? नागरिकांना माहिती असावी मनपाच्या ‘ताब्यातील रस्त्यांची नोंदवही’

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading