Shrigonda Noise Pollution Action: श्रीगोंदा पोलिसांची व्यापारी असोसिएशनसोबत बैठक - Rayat Samachar

Shrigonda Noise Pollution Action: श्रीगोंदा पोलिसांची व्यापारी असोसिएशनसोबत बैठक

डीजे, कर्णकर्कश बँड, फटाके व बुलेटच्या आवाजावर कडक कारवाईचा इशारा

rayatsamachar
2 Min Read
श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उपस्थितीत व्यापारी असोसिएशनची बैठक; ध्वनीप्रदूषणाविरोधात कठोर कारवाईचा इशारा.SubEditor | Dipak Shirsath

श्रीगोंदा | माधव बनसुडे

(Shrigonda Noise Pollution Action) शहरातील शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी असोसिएशनची विशेष बैठक पार पडली. शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. व्यापाऱ्यांनी ध्वनीप्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत पोलिसांकडे विविध सूचना व मागण्या मांडल्या. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला.

(Shrigonda Noise Pollution Action) बैठकीत सार्वजनिक कार्यक्रम आणि मिरवणुकांमध्ये डीजेला परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच अतिउच्च आवाज करणाऱ्या बँड चालकांविरोधात ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
(Shrigonda Noise Pollution Action) रात्री मोठ्या आवाजात फटाके फोडून शांततेचा भंग करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
याशिवाय, शाळा, महाविद्यालय परिसर आणि मुख्य बाजारपेठेत बेकायदेशीररीत्या बदल केलेल्या सायलेन्सरमुळे कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकी चालकांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. अशा वाहनांचे सायलेन्सर जप्त करून संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.
बैठकीत व्यापारी असोसिएशनने शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. तसेच ‘एक कॅमेरा पोलिसांसाठी’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या दुकानासमोर एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पोलिसांनी स्वागत करून व्यापाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading