जामखेड | रिजवान शेख
RAWE Program 2026-27: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, हाळगाव येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ‘ग्रामीण कृषी जागृकता आणि औद्योगिक कार्यानुभव (RAWE) कार्यक्रम २०२६-२७’ अंतर्गत द्वितीय मासिक आढावा बैठक नान्नज येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी दोन महिन्यांत राबविलेल्या विविध कृषी प्रात्यक्षिके, शेतकरी प्रशिक्षण आणि विस्तार उपक्रमांचा सविस्तर आढावा सादर केला.
कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी फळबाग लागवडीसाठी खड्डे भरणे, बोर्डो मिश्रण तयार करणे, विस्तार शिक्षण प्रात्यक्षिकांतर्गत व्हॉट्सॲप शेतकरी गटाची निर्मिती आणि कृषीविषयक ज्ञानप्रसार यासह विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच गावामध्ये सहभागी ग्रामीण मूल्यांकन (PRA) उपक्रमही राबविण्यात आला.
बैठकीत विद्यार्थ्यांच्या दोन महिन्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे उपस्थित विषयतज्ज्ञांनी कौतुक केले. तसेच विविध विषयांवरील विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून पुढील कार्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीस सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनावणे, कार्यक्रम समन्वयक, केंद्रप्रमुख व कृषी विस्तार शिक्षण विषयतज्ज्ञ डॉ. गोकुळ वामन, अधिष्ठाता प्रतिनिधी व वनस्पतीशास्त्र विषयतज्ज्ञ डॉ. विवेकानंद कुलकर्णी, फलोत्पादन विषयतज्ज्ञ प्रा. पोपट पवार, कार्यक्रम अधिकारी व फलोत्पादन विषयतज्ज्ञ डॉ. संदीप मोरे, कृषी अर्थशास्त्र विषयतज्ज्ञ डॉ. प्रणाली ठाकरे, वनस्पती रोगशास्त्र विषयतज्ज्ञ डॉ. मनोज गुड, कृषी कीटकशास्त्र विषयतज्ज्ञ डॉ. ए. आर. हजारे, कृषी अभियांत्रिकी विषयतज्ज्ञ डॉ. प्रेरणा भोसले, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषयतज्ज्ञ डॉ. निकिता धाडगे तसेच कृषिशास्त्र विषयतज्ज्ञ प्रा. अर्चना महाजन उपस्थित होते.
सर्व विषयतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना तसेच शेतकरी बांधवांना विविध कृषी विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
कृषिदूत कु. अभिषेक टकले, कु. स्वप्नील उदमले, कु. कार्तिकेय तागडे, कु. संकेत देशमुख, कु. दिग्विजय नाईक, कु. प्रविण कुडाळ, कु. गौरव टापरे, कु. यश पन्हाळे, कु. मयुर पारसे, कु. राजवीर पाटील, कु. आदित्य पोकळे, कु. आनंद राठोड, कु. स्वप्नील राऊत, कु. क्षितीज संकपाळ, कु. सचिन सपकाळे, कु. दिग्विजय शिंदे, कु. विशाल शिंदे, कु. साहिल शिंगोटे आणि कु. आर्यन सुपेकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवून विविध कृषी प्रात्यक्षिके व विस्तार उपक्रम यशस्वीपणे राबविले.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


