Rohit Pawar Statement | 45 लाख हेडगेवार नाटकाला; छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यक्रमाला फक्त 10 लाख? रोहित पवारांचा परखड सवाल - Rayat SamacharRohit Pawar Statement ₹४५ लाख हेडगेवार नाटकाला, संभाजी महाराज कार्यक्रमाला ₹१० लाख; रोहित पवारांचा सरकारला सवाल

Rohit Pawar Statement | 45 लाख हेडगेवार नाटकाला; छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यक्रमाला फक्त 10 लाख? रोहित पवारांचा परखड सवाल

छत्रपतींना कमी लेखून विशिष्ट विचारसरणी लादण्याचा प्रयत्न?

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
हेडगेवार नाटक व छत्रपती संभाजी महाराज कार्यक्रमासाठी मंजूर निधीवरून राज्य सरकारवर रोहित पवार यांची टीकाSubEditor | Dipak Shirasath

मुंबई | ३.७ | रयत समाचार

(Rohit Pawar Statement) राज्य सरकारने डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित ‘युगप्रवर्तक- डॉ. हेडगेवार’ या नाटकाच्या आयोजनासाठी ₹४५ लाखांची आर्थिक मंजुरी दिली असून, दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावरील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी केवळ ₹१० लाख मंजूर केल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

 

हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा

- Advertisement -

 

(Rohit Pawar Statement) या निर्णयावरून कर्जतजामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्यलढ्यात काडीचंही योगदान नसलेल्या विभाजनकारी विचारसरणीच्या डॉ. हेडगेवार यांच्या नाटकासाठी राज्य सरकारने ₹४५ लाख मंजूर केले, मात्र प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य वाढविणारे, सांभाळणारे आणि बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यक्रमासाठी फक्त ₹१० लाख मंजूर करण्यात आले. हा भेदभाव का?

 

हे हि वाचा : History | द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

 

(Rohit Pawar Statement) रोहित पवार पुढे म्हणाले, या निर्णयावरून सरकारला नेमकं काय दाखवायचं आहे? छत्रपतींना कमी लेखण्याचा आणि लोकांना मान्य नसलेल्या विचारसरणीला त्यांच्यावर लादण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? महाराष्ट्र हे कदापि खपवून घेणार नाही.

 

शासन निर्णयात काय? : २ जुलै २०२६ रोजी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार ‘युगप्रवर्तक- डॉ. हेडगेवार’ या नाटकाच्या राज्यातील सहा ठिकाणच्या प्रयोगांसाठी ₹४५ लाखांची आर्थिक मंजुरी देण्यात आली. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ₹१० लाखांची मंजुरी देण्यात आली. या दोन्ही शासन निर्णयांतील निधीतील मोठ्या तफावतीमुळे शिवशंभूप्रेमींनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राज्यात या मुद्द्यावर आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, सरकारकडून यावर काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

- Advertisement -

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading