पिंपळगाव माळवीत १६ डिसेंबरला आयोजन
नगर तालुका | १५ डिसेंबर | प्रतिनिधी
Ahilyanagar News तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज भोंदे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम साप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सोमवारी ता.१६ डिसेंबर ते २३ डिसेंबर कालावधीत आयोजित करण्यात आला.
वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज भोंदे यांनी पिंपळगाव माळवी पंचक्रोशीमध्ये अध्यात्मिक परंपरा जपली व परिसरातून पंढरपूर, आळंदी, पैठण पायी दिंडी सोहळा आपल्या हयातीत अखंडपणे चालविला. त्यांच्या प्रेरणेने आजही पिंपळगाव माळवी पंचक्रोशीत आध्यात्मिक परंपरा जपली जात आहे. Ahilyanagar News या साप्ताहकाळात काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, कीर्तन व महाप्रसाद यांचे आयोजन केले आहे.
या सप्ताहामध्ये हभप बापूसाहेब महाराज देहूकर, हभप चिदंबरेश्वर महाराज साखरे, हभप उल्हास महाराज सूर्यवंशी, हभप डॉ.जयवंत महाराज बोधले, हभप पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, हभप अनिल महाराज पाटील, हभप नारायण महाराज जाधव, हभप रामभाऊ महाराज राऊत यांची कीर्तनसेवा होणार आहे. या सप्ताहाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले.