श्रीरामपूर | ५ फेब्रुवारी | शफीक बागवान
(social) आधी पुनर्वसन करून नंतरच श्रीरामपूर शहर स्मार्ट बनवण्यासाठी नगरपालिकेने खासबाब म्हणून शहराच्या चौफेर रस्त्यावर रस्ते दुभाजक टाकावेत, अशी कळकळीची मागणी बागवान, आतार, मणियार, पिंजारी, तांबोळी, कुरेशी, मुजावर, खाटीक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
(social) प्रशासक किरण पाटील तसेच मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना ई-मेल द्वारा पाठविलेल्या निवेदनात या सर्वांनी म्हटले आहे, सद्यस्थितीत श्रीरामपूर शहराच्या चौफेर रस्त्यावरील अतिशय जुनाट असलेले अतिक्रमण काढण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर काढण्यात आलेल्या या अतिक्रमणामुळे सर्वत्र शहरातील रस्ते आता मोकळे झाले आहेत. यापुढे शहराच्या विकासाला गती मिळणार आहे. अतिक्रमणधारकांचे तातडीने पुनर्वसन करून मोकळ्या झालेल्या सर्व त्या रस्त्यांवर खास बाब म्हणून रस्ते दुभाजक टाकावेत जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे अतिक्रमण होणार नाही.
(social) शहरातील चारही बाजूच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे शहराच्या विकासाला खीळ बसली होती. आता यापुढे शहर स्मार्ट शहर बनविण्यासाठी शासनाला संधी प्राप्त झाली. चारही बाजूच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे खेड्यापाड्यातील आणि गावोगावाहून येणाऱ्या नागरिकांना दुचाकी बरोबरच चार चाकी वाहने लावण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. शहरातील रस्ते मोकळे करावेत, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची हजारो नागरिकांची मागणी होती. सध्या हे रस्ते मोकळे झाले असून भविष्यात पुन्हा असे अतिक्रम होऊ नये म्हणून पालिकेने शासनाकडे खासबाब म्हणून रस्त्यांच्या चारही बाजूला बाजूच्या रस्त्यांच्या मधोमध तातडीने रस्ते दुभाजक टाकण्यासाठी शासनाकडून निधी आणावा आणि उघडलेले रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, तसेच अतिक्रमणधारकांना तातडीने दुकाने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी अकबरभाई बागवान, हाजी शफीक बागवान, हाजी नासीर बागवान, इब्राहीम कुरेशी, खिर्डी ग्रामपंचायतीचे सदस्य कंकर बागवान, मन्सूर बागवान, अरुणोदय पतसंस्थेचे संचालक अकील बागवान, हाजी कलीम बागवान, आसिफ बागवान, रेहान बागवान, सलीम काकर, इब्राहीम मुजावर, अन्वर खाटीक, शफीक आतार, मोहम्मद तांबोळी, डॉ. मन्सूर शाह, मेहबूब शाह, शकील काकर, साजिद मणियार, शाहरुख बागवान, शफीक आतार, मोहसीन तांबोळी, असिफ पिंजारी, हुमायून अन्सारी, कय्युम नालबंद, अहमद रंगरेज, आदींनी केली.
हे हि वाचा : History | द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर