अहमदनगर | २ फेब्रुवारी | प्रतिनिधी
(latest news) शहरातील वाडीयापार्क येथील कुस्ती मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत राडा झाला. उपांत्य फेरीत पराभवानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी पंचांना लाथ मारली. यावेळी ते म्हणाले, “पंचांनी चुकीचा निर्णय दिला आहे. आम्हाला हा निर्णय मान्य नाही. तुम्ही रिप्ले बघा. प्रतिस्पर्ध्याने डाव केला असेल, प्रतिस्पर्धेचे दोन्ही खांदे टेकले असतील तर कुस्ती फोल होते. तुम्ही रिव्ह्यू बघा. माझे दोन्ही खांदे टेकले नाहीत. चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही. कुस्ती चित झाली असेल तरच तुम्हाला निर्णय देता येतो. अर्जंटमध्ये कुस्तीचा पुकार पंचांनी केला. मल्लाला दहा ते पंधरा मिनिटे तरी वेळ द्यायला पाहिजे. आम्हाला रिप्ले दाखवा, अशी आमची मागणी आहे”
(latest news) ते पुढे म्हणाले, “कुस्ती झालेली नाही. ही कुस्ती देवून टाकलेली आहे. आम्ही अजित पवारांकडे रिव्ह्यू दाखवा, अशी मागणी केली. कुस्ती झाली असेल, माझी पाठ टेकली असेल तर आम्ही आमचा पराभव मान्य करतो. आम्ही वर्षभर कष्ट करतोय. या पंचांना काय माहिती आम्ही किती मेहनत करतोय. अजित दादांनी रिव्ह्यू दाखवायला लावला आहे. कुस्ती चित झालीच नव्हती. पंचांचा शंभर टक्के चुकीचा आहे. पंचांचा एक तरी पोरगा आहे का कुस्तीत? ज्यांचे कर्म त्यांच्यापाशी”
(latest news) ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा उपांत्य सामना पार पडत असताना मोठा गोंधळ उडाला. गादी विभागामधून नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी ठरलेला पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना पार पडत होता. दोघांमध्ये काँटेची टक्कर सुरु असताना शिवराज राक्षे याचा पराभव झाला. यानंतर शिवराज राक्षे याला इतका राग अनावर झाला की, त्याने पंचांना लाथ मारली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. या कुस्तीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे उपस्थित होते. त्यांच्यासमोर राडा झाला.
हे हि वाचा : History | द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
Leave a Reply