Man Mandira Kirtan | झी 'मन मंदीरा'च्या मंचावर 'नास्तिक धर्म' इतिहासाचा विपर्यास? वारकरी धर्माच्या आडून दिशाभूल - Rayat SamacharMan Mandira Kirtan मन मंदीरा कीर्तनात इतिहासाचा विपर्यास? वारकरी परंपरेतून आक्षेप

Man Mandira Kirtan | झी ‘मन मंदीरा’च्या मंचावर ‘नास्तिक धर्म’ इतिहासाचा विपर्यास? वारकरी धर्माच्या आडून दिशाभूल

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
'मन मंदीरा' कार्यक्रमातील कीर्तनादरम्यान केलेल्या विधानावरून इतिहासाच्या संदर्भात नवा वाद

ग्यानबाची मेख | ३.७ | भैरवनाथ वाकळे

(Man Mandira Kirtan) आज रोजी सायंकाळी ६:३० दरम्यान प्रसारीत झालेल्या झी टॉकीजवरील ‘मन मंदीरा’ या कीर्तन कार्यक्रमात एका ‘अज्ञानी’ कीर्तनकाराने संत ज्ञानेश्वर महाराजांनी माधुकरी मागून आणलेले अन्न ‘नास्तिक’ लोक फेकून देत असत, असा दावा केल्याने नवा वाद निर्माण झाला. या विधानावर वारकरी अभ्यासक आणि सामाजिक माध्यमांवर तीव्र आक्षेप नोंदवले जात आहेत.

 

हे ही वाचा : Crime | रस्ता ‘चोरी’ला गेला ? नागरिकांना माहिती असावी मनपाच्या ‘ताब्यातील रस्त्यांची नोंदवही’

- Advertisement -

 

(Man Mandira Kirtan) इतिहासातील उपलब्ध संदर्भांनुसार संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई या भावंडांना तत्कालीन सनातनी वैदिक धर्मातील काही धर्ममार्तंडांकडून बहिष्कार आणि छळ सहन करावा लागल्याचे विविध दाखले संतचरित्रग्रंथांमध्ये नमूद करण्यात आले आहेत. त्यांच्या आईवडिलांना ‘देहांत प्रायश्चित्त’ घेण्यास भाग पाडल्याचाही उल्लेख अनेक ऐतिहासिक स्रोतांमध्ये आढळतो. अशा परिस्थितीत या छळाचे खापर इतर ‘नास्तिक धर्मांवर’ फोडणे म्हणजे इतिहासाचे विकृतीकरण असल्याचा आरोप केला जात आहे.

 

हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा

 

(Man Mandira Kirtan) यातील आणखी एक विशेष बाब म्हणजे हा कीर्तन महोत्सव जैन सोशल फेडरेशन आणि राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. जैन धर्म हा भारतीय तत्त्वज्ञानातील वैदिक वर्गीकरणानुसार ‘नास्तिक’ परंपरांपैकी एक मानला जातो, कारण तो वेदांचे प्रामाण्य स्वीकारत नाही. तसेच आधुनिक तत्त्वज्ञानानुसारही जैन धर्म सृष्टीचा निर्माता असा सर्वशक्तिमान ईश्वर मानत नाही. त्यामुळे ज्या कार्यक्रमाचे आयोजक जैन परंपरेचे होते, त्याच मंचावर ‘नास्तिक’ हा शब्द अवमानकारक अर्थाने वापरला गेल्याबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Man Mandira Kirtan झी टॉकीजच्या 'मन मंदीरा' कीर्तन कार्यक्रमातील दृश्य

भारतीय तत्त्वज्ञानात ‘नास्तिक’ या शब्दाचे दोन अर्थ आहेत. वैदिक परंपरेनुसार वेदांचे प्रामाण्य न मानणाऱ्या बौद्ध, जैन आणि चार्वाक परंपरांना ‘नास्तिक’ म्हटले जाते. मात्र आधुनिक भाषेत ‘नास्तिक’ म्हणजे सृष्टीचा निर्माता ईश्वर मानत नाही असा निरीश्वरवादी. या दोन संकल्पना वेगळ्या असल्याने त्यांची गल्लत करून समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतात, असे अभ्यासकांचे मत आहे.
वारकरी धर्म हा समता, भक्ती आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. त्यामुळे इतिहासाचा विपर्यास करून समाजात फूट पाडणारी किंवा विशिष्ट धर्म व समाजाविषयी चुकीची प्रतिमा निर्माण करणारी विधाने सार्वजनिक मंचावर केली जात असतील, तर त्यावर वस्तुनिष्ठ चर्चा होणे आवश्यक असल्याची भावना अनेक खरे वारकरी व्यक्त करत आहेत.
इतिहास बदलून सांगितला की, श्रद्धा वाढत नाही; उलट सत्य झाकण्याचा प्रयत्न होतो. वारकरी परंपरेची ताकद समतेत आहे, खोट्या आरोपांत नाही.

 

Public issue | तासन्‌तास वीज गेली? ग्राहक नुकसान भरपाई मागू शकतो; महावितरणचे नियम काय सांगतात?

- Advertisement -

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading