अहमदनगर | २८.६ | रयत समाचार
(Shahu Jayanti) राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकराजा आणि तत्त्वज्ञ होते. लोककल्याणाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी अनेक ऐतिहासिक आणि लोकहितकारी निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी केली. आजच्या काळात त्यांच्या विचारांचे स्मरण, जतन आणि व्यापक प्रसार करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रमुख व्याख्याते अशोक सिब्बल ? यांनी केले.
समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयातील सभागृहात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या Shahu Jayanti आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला सहायक आयुक्त प्रवीण कृरघंटीवार, विशेष अधिकारी सावित्रा लबडे, सहाय्यक लेखाधिकारी संदीप देठे, रेणाविकर विद्यालयाचे प्राचार्य राजेश भालसिंग, बार्टीचे वरिष्ठ संशोधन अधिकारी दिलावर सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
Shahu Jayanti प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना अशोक सिब्बल ? म्हणाले, सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून काम करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे. त्यांनी सामाजिक न्याय, समानता आणि सर्वधर्मसमभावाची मूल्ये केवळ मांडली नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीतून ती समाजासमोर उभी केली. वैचारिक प्रबोधनाचा त्यांचा वारसा आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे.
शिक्षणाचा प्रसार, महिलांच्या सक्षमीकरणासाठी कायदे व धोरणे, आरक्षणाची अंमलबजावणी, सर्व धर्मीयांना समान रोजगाराच्या संधी, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, सिंचन व्यवस्था, सहकारी संस्थांची उभारणी, औद्योगिक विकास तसेच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यात राजर्षी शाहू महाराजांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्राचार्य राजेश भालसिंग यांनी आपल्या मनोगतात सांगितले, राजर्षी शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरी केली जाते. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी शिंगवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन विशेष अधिकारी सावित्रा लबडे यांनी केले.
कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, बार्टीचे समतादूत तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समता दिंडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सहायक आयुक्त प्रवीण कृरघंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडीला प्रारंभ झाला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले.
Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



