Hasya Jatra | 'हास्य जत्रे'ची बदनामी थांबवा; अश्लील थंबनेल्सवर दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांचा संताप - Rayat SamacharHasya Jatra हास्य जत्रेची बदनामी थांबवा; अश्लील थंबनेल्सवर दिग्दर्शक सचिन गोस्वामी संतप्त

Hasya Jatra | ‘हास्य जत्रे’ची बदनामी थांबवा; अश्लील थंबनेल्सवर दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांचा संताप

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
महाराष्ट्राची हास्य जत्रा' कार्यक्रमावरील आक्षेपार्ह थंबनेल्सविरोधात दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची तीव्र प्रतिक्रियाSubEditor | Dipak Shirasath

मुंबई | ३.७ | रयत समाचार

लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ संदर्भात सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह थंबनेल्स आणि दिशाभूल करणाऱ्या कॅप्शन विरोधात Hasya Jatra दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘हा विकृतीचा कळस असून, कार्यक्रमाची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे,’ असा परखड आरोप त्यांनी केला.

हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा

गेल्या आठ वर्षांपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ Hasya Jatra कार्यक्रम प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवत असून लवकरच त्याचे १००० भाग पूर्ण होणार आहेत. जगभरातील मराठी प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची मोठी लोकप्रियता आहे.

हे ही पहा : घाशिराम कोतवाल चित्रपट पहा

- Advertisement -
गोस्वामी यांनी सांगितले, कार्यक्रमाचे अनेक भाग सोनी मराठीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलसह विविध यूट्यूब चॅनेल्सवरही प्रसारित केले जात आहेत. मात्र, काही अधिकृत आणि अनेक अनधिकृत चॅनेल्स केवळ अधिक व्ह्यूज आणि आर्थिक फायद्यासाठी अत्यंत अश्लील थंबनेल्स आणि भडक कॅप्शन वापरत आहेत. त्यामुळे Hasya Jatra कार्यक्रमाची प्रतिमा मलिन होत असून, प्रेक्षकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे.

Hasya Jatra महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमाच्या यूट्यूब थंबनेल्सवर सचिन गोस्वामी यांनी व्यक्त केलेला संताप.

ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काहीजण आर्थिक फायदा मिळवत आहेत, त्याच कार्यक्रमाची अशा पद्धतीने बदनामी करताना त्यांना लाज वाटत नाही का? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
यापुढे बोलताना गोस्वामी म्हणाले, हा प्रकार अत्यंत क्लेशदायक आहे. प्रेक्षकांनी अशा थंबनेल्स किंवा कॅप्शनमुळे कार्यक्रमाच्या दर्जाबाबत गैरसमज करून घेऊ नये. आम्ही नेहमीच दर्जेदार आणि कौटुंबिक मनोरंजन देण्यासाठी कटिबद्ध आहोत.
तसेच, संबंधितांनी असे प्रकार तातडीने थांबवावेत आणि कोणालाही आक्षेपार्ह थंबनेल किंवा कॅप्शन आढळल्यास संबंधित व्हिडिओ यूट्यूबवर रिपोर्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading