पारनेर | २६.६ | रयत समाचार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या CPI Parner पारनेर तालुका कौन्सिलची बैठक आज ता.२६ रोजी पारनेर येथे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. बबनराव सालके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत शेतकरी, शिक्षण व स्थानिक प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्यात आली.
CPI Parner बैठकीत ७ जुलै रोजी शेतकरी कर्जमाफी, स्मार्ट मीटर योजना, शिक्षणाचे खाजगीकरण तसेच विविध स्थानिक प्रश्नांवर पारनेर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
याशिवाय भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय कौन्सिलने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ६ ते १५ ऑगस्टदरम्यान गावागावांत पदयात्रा, १ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे मोर्चा, तसेच ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनतेच्या दारी – संवाद घरोघरी’ ही जनसंपर्क मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन करण्यात आले.
CPI Parner बैठकीस भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे, जिल्हा सहसचिव कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, पारनेर तालुका सचिव कॉ. संतोष खोडदे, किसान सभेचे तालुकाध्यक्ष सुभाष ठुबे, तालुका सहसचिव बबनराव रावडे, किसान सभेचे सचिव संपत रावडे, सुलाबाई आदमाने, माजी उपसरपंच हरिभाऊ गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय भगत, भागवत गायकवाड, विकास शिंदे, चंद्रकांत चौधरी, जयसिंगराव गायकवाड, संजय जाधव, पप्पू शेख, दादाभाऊ शिंदे, आर. टी. ठुबे, हेमंत पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे ही वाचा : Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
Yoga Day | 21जून आंतरराष्ट्रीय योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



