अहमदनगर | २८.६ | रयत समाचार
अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय देशपांडे यांनी फेसबुकवर केलेली एक पोस्ट सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉ. मेधा कुलकर्णी यांना थेट मेन्शन करत ब्राह्मण समाजाच्या भावना व्यक्त केल्याचा दावा केला आहे. Brahmin BJP या पोस्टसोबत अभिमन्यू पवार हे मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचा सत्कार करतानाचा फोटो जोडण्यात आला असून, त्यावरून सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
हे ही वाचा : Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
देशपांडे यांच्या Brahmin BJP पोस्टवर अनेक ब्राह्मण समाजातील व्यक्तींनी प्रतिक्रिया नोंदवल्या असून, त्यातील अनेक प्रतिक्रिया त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही पोस्ट केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित न राहता राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय बनली.
Brahmin BJP या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या राजकारणातील ‘चाणक्य’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय रणनीतीत नेमकी कुठे चूक होत आहे, याविषयीही सोशल मीडियावर विविध स्तरांतून चर्चा रंगू लागली आहे.
देशपांडे यांनी फेसबुकवर लिहिले आहे,
“आता कळलं कां हा अभ्या म्हणजे कोण….”
त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि डॉ. मेधा कुलकर्णी यांना उद्देशून म्हटले आहे की,
“तुम्ही कितीही भाजपा साठी हिंदुत्व म्हणून कार्य केले तरी भाजपा मध्ये देवेंद्र साहेबांनी सगळेच जातीयवादी आमदारांना दुसऱ्या पक्षातून आपल्या पक्षात घेऊन फक्त स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी नेहमीच ब्राह्मण समाजाशी प्रतारणा केली आहे… आणि मूळ भाजपा कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलण्याचे काम दिले आहे.
परवा झालेल्या चर्चेनंतर ५ टक्के ब्राह्मण भाजपा विरोधात तयार झाले आहेत. आता फक्त जाहीरपणे बोलण्याची गरज आहे. ५ चे ५० टक्के व्हायला वेळ लागणार नाही.
भाजपा ला वाटते की ब्राह्मण समाज त्यांच्या दावणीला बांधला आहे. प्रत्येक वेळी आपल्या समाजातील १०-१५ जणांना पदे दिली की समाज शांत बसतो.
देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की, कृपया ब्राह्मण समाजाला गृहीत धरणे बंद करा की आम्ही कायम भाजपासोबतच राहू.”
या पोस्टनंतर सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत असून, राज्यातील बदलत्या सामाजिक राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
(टीप : या वृत्तामध्ये विजय देशपांडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये व्यक्त केलेली मते आणि दावे वृत्तांकनाच्या उद्देशाने जसेच्या तसे दिले आहेत. या मतांशी ‘रयत समाचार’ सहमत आहे, असा त्याचा अर्थ होत नाही.)
Yoga Day | 21जून आंतरराष्ट्रीय योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



