Agriculture | कांदा गहू हमीभावासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; 21 एप्रिलला तहसीलवर मोर्चा - Rayat Samachar

Agriculture | कांदा गहू हमीभावासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; 21 एप्रिलला तहसीलवर मोर्चा

rayatsamachar
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

शेवगाव | १७.४ | रयत समाचार

(Agriculture) कांदा व गहू पिकांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव जाहीर करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने मंगळवारी ता. २१ एप्रिल रोजी शेवगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांनी दिली.

 

(Agriculture) याबाबत अधिक माहिती देताना ॲड. लांडे म्हणाले, सध्या कांदा काढणीच्या हंगामात असूनही बाजारात भाव कोसळले आहेत. गव्हालाही समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होत नाही. परिणामी शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र, केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

- Advertisement -
(Agriculture) शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा, गहू तसेच सर्व पिकांना ‘उत्पादन खर्च + ५० टक्के नफा’ या सूत्रानुसार हमीभाव जाहीर करावा, अशी ठाम मागणी किसान सभेने केली आहे. या मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २१ एप्रिल रोजी होणाऱ्या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

या आंदोलनात ॲड. सुभाष लांडे यांच्यासह संदिप इथापे, बापुराव राशीनकर, बबनराव पवार, दत्ता आरे, बबनराव लबडे, गणेश खोसे, कारभारी वीर, विष्णू गोरे, गोरक्षनाथ काकडे, मुरलीधर काळे, अशोक नजन आदी नेते व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading