Women | ‘जया द्वादशीवार स्मृती सन्मान’चे वितरण; साहित्य, संस्कृती, समाजकार्य, अध्ययन क्षेत्रातील महिलांचा गौरव - Rayat Samachar

Women | ‘जया द्वादशीवार स्मृती सन्मान’चे वितरण; साहित्य, संस्कृती, समाजकार्य, अध्ययन क्षेत्रातील महिलांचा गौरव

rayatsamachar
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

सेवाग्राम | १७.६ | रयत समाचार

(Women) साहित्य, संस्कृती, समाजकार्य आणि अध्ययन या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या चार कर्तृत्ववान महिलांना ‘जया द्वादशीवार स्मृती सन्मान २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह, कृतज्ञता निधी आणि ग्रंथ असे या सन्मानाचे स्वरूप असून, समाजातील प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्याचा हा उपक्रम आहे.

- Advertisement -

(Women) यंदाच्या सन्मानासाठी मेघा पानसरे, ऐश्वर्या रेवडकर, कुसुम आलाम आणि वर्षा ढोके यांची निवड करण्यात आली आहे. या चारही मानकरींनी आपल्या कार्यातून समाजजीवनात मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचा गौरव केला जाणार.

(Women) सन्मान समारंभ गुरुवारी ता. २३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता सेवाग्राम येथे आयोजित करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सहवासाने पावन झालेल्या सेवाग्राममध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात प्रसिद्ध मुक्त पत्रकार आणि ‘अभिव्यक्ती वाहिनी’चे प्रवक्ते रवींद्र पोखरकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल.

सोहळ्यास साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असून, आयोजकांनी नागरिक, साहित्यप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप दाते, प्रमोद मुनघाटे, देवेंद्र गावंडे, सुषमा शर्मा, श्रीमंत माने, वर्षा बाशू आणि सुरेश द्वादशीवार यांनी केले असून, या कृतज्ञतेच्या सोहळ्यात उपस्थित राहून मानकरी महिलांचा गौरव वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.

Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading