Politics | सर्जेराव, ज्या ताटात जेवलात, त्याच ताटात घाण नसते करायची; तांबेच्या 'बेईमान' पोस्ट काँग्रेसचा जोरदार हल्ला - Rayat Samachar

Politics | सर्जेराव, ज्या ताटात जेवलात, त्याच ताटात घाण नसते करायची; तांबेच्या ‘बेईमान’ पोस्ट काँग्रेसचा जोरदार हल्ला

महिला आरक्षणावरून वाद पेटला

rayatsamachar
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | १८.४ | रयत समाचार

(Politics) महिला आरक्षण विधेयकावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, सर्जेराव तथा सत्यजीत तांबे यांच्या आत्ताच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या २०.९.२०२३ सालच्या सोशल मीडिया पोस्टचा दाखला देत महाराष्ट्र काँग्रेसने जोरदार पलटवार केला. केंद्र सरकारच्या नव्या अधिसूचनेच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिकच तीव्र झाला आहे.

(Politics) सत्यजीत तांबे यांनी आपल्या पोस्टमध्ये, महिला आरक्षण विधेयक संसदेत अपयशी ठरल्याचा दिवस दु:खद आहे, असे म्हटले होते. मात्र, भारत महिलांच्या हक्कांबाबत प्रगत देश असल्याचे सांगत त्यांनी भारतीय महिलांना स्वातंत्र्याच्या सुरुवातीपासून मतदानाचा अधिकार मिळाल्याची आठवण करून दिली.

(Politics) दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ मध्ये लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याला ‘ऐतिहासिक क्षण’ असे संबोधत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते. त्यांनी या निर्णयामुळे लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार असल्याचे नमूद केले.
दरम्यान, कायदा व न्याय मंत्रालयाच्या १६ एप्रिल २०२६ च्या अधिसूचनेनुसार ‘संविधान (१०६वा दुरुस्ती) अधिनियम, २०२३’ लागू करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेमुळे महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला औपचारिक सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याच मुद्द्यावर काँग्रेसने तांबे आणि भाजपवर टीका करत म्हटले, महिलांच्या हक्कांची पायाभरणी काँग्रेसच्या सत्ताकाळात झाली. आज जे श्रेय घेतले जात आहे, त्यामागे काँग्रेसचेच योगदान आहे. ज्या ताटात जेवलात, त्याच ताटात घाण करू नये.

काँग्रेसने पुढे प्रश्न उपस्थित केला की, विधेयक मंजूर झाल्यानंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणीला इतका विलंब का? महिलांना प्रत्यक्ष प्रतिनिधित्व कधी मिळणार?

या सर्व घडामोडींमुळे महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, काँग्रेस-भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading