Women | ॲड. मीनल देशमुख संगमनेर वकील संघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

संगमनेर | १.५ | रयत समाचार

(Women) संगमनेर वकील संघाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. मीनल देशमुख या बहुमताने विजयी झाल्या असून त्यांनी संघाच्या इतिहासात पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान पटकावला आहे. त्यांच्या या निवडीमुळे कायदेक्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

(Women) ॲड. देशमुख या विवेकी विचारांच्या, सामाजिक भान असलेल्या आणि अभ्यासू वकील म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून निशा शिवूरकर आणि सहकाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

(Women) यावेळी प्रतिक्रिया देताना निशा शिवूरकर म्हणाल्या, महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या कामात मीनल देशमुख त्यांच्या सहकारी राहिल्या आहेत. माणसे जोडण्याची तिची हातोटी ही तिची मोठी ताकद आहे. तिला सामाजिक आणि राजकीय चळवळीचा समृद्ध वारसा लाभला आहे. डाव्या पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. दत्ता देशमुख यांची ती नात असून तिचे वडील कॉ. गुलाबराव देशमुख हेही संगमनेरमधील चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते.
आज दोघेही आपल्यात नाहीत, मात्र त्यांचा विचारांचा वारसा मीनल देशमुख निश्चितच पुढे नेतील, असा विश्वास शिवूरकर यांनी व्यक्त केला.
संगमनेर वकील संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या ॲड. मीनल देशमुख आणि त्यांच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला सर्वस्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading