पुणे |१४.९ | पंकज गुंदेचा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या ४१ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) २०२६ च्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी २७ सप्टेंबर २०२६ रोजी नियोजित असलेली SET परीक्षा आता २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SET परीक्षा विभागाने शुद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SET परीक्षा विभागाने दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी OW/2026/G/142 क्रमांकाचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये ४१ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा २०२६ च्या परीक्षा दिनांकातील बदलाची अधिसूचना देण्यात आली आहे.

यापूर्वी ही परीक्षा रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच अन्य स्पर्धात्मक परीक्षांचे अलीकडे वेळापत्रक प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशी असल्याने परीक्षार्थींना प्रवास तसेच परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या व्यावहारिक अडचणी उद्भवू शकतात.
या पार्श्वभूमीवर परीक्षार्थींकडून प्राप्त झालेल्या निवेदनांचा सर्वंकष विचार करण्यात आला. परीक्षार्थींचे हित तसेच परीक्षा आयोजनातील सोय लक्षात घेऊन २७ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आलेली ४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा २०२६ आता २५ ऑक्टोबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
ही अधिसूचना सर्व संबंधित परीक्षार्थी, परीक्षा संपर्क प्रमुख तसेच संबंधित सर्व यंत्रणांना लागू असल्याचे SET परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. सर्व संबंधितांनी सुधारित परीक्षा तारखेची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


