अहिल्यानगर | १४.९| पंकज गुंदेचा
Education: अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि अहिल्यानगर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मुख्याध्यापकांचे एकदिवसीय चर्चासत्र उत्साहात पार पडले. या चर्चासत्राच्या निमित्ताने मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ श्री भवानी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळीमानूर, ता. पाथर्डी येथील प्राचार्य देविदास सोनटक्के यांना प्रदान करण्यात आला.
हा मानाचा पुरस्कार आमदार संग्राम जगताप तसेच आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते प्राचार्य देविदास सोनटक्के यांना प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले विविध उपक्रम, विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न, लोकसहभागातून विद्यालयाच्या भौतिक सुविधांमध्ये केलेल्या सुधारणा तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक, संध्या गायकवाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी, बाळासाहेब बुगे, शिक्षणाधिकारी (योजना), अतिश लहाने, वरिष्ठ लेखा अधिकारी आणि रामदास मस्के, वेतन पथक अधीक्षक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, जिल्हा सरचिटणीस मिथुन डोंगरे यांच्यासह माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन आप्पासाहेब शिंदे, विद्यमान चेअरमन बाबासाहेब बोडखे आणि संचालक शिवाजीराव लवांडे यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक तसेच मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत प्राचार्य देविदास सोनटक्के यांचा पुरस्काराने झालेला गौरव हा त्यांच्या शैक्षणिक कार्याची पावती मानली जात आहे.
प्राचार्य देविदास सोनटक्के यांना ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक, मित्रपरिवार तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे श्री भवानी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळीमानूर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


