Fatakamukt Diwali: श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात फटाकेमुक्त दिवाळीची शपथ - Rayat Samachar

Fatakamukt Diwali: श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात फटाकेमुक्त दिवाळीची शपथ

विष्णू गायकवाड यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

rayatsamachar
1 Min Read

पाथर्डी | २९.१० | पंकज गुंदेचा

Fatakamukt Diwali: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड यांनी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, कासार पिंपळगाव येथे विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळीची शपथ देत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत विद्यार्थ्यांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. आपले सण आणि उत्सव आनंदाने साजरे करताना पर्यावरणाचे रक्षण आणि प्राचीन संस्कृतीचे जतन केले पाहिजे, असे मार्गदर्शन विष्णू गायकवाड यांनी केले.

 

Fatakamukt Diwali

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासणे, वृक्षलागवड करणे, पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करणे, असे सामाजिक संदेश दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक गोसावी सर होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक नवाते सर, शंकर बरकडे, मागीरवाड सर, श्री. शिवाजी लवांडे, राजेंद्र वांढेकर, सचिन चव्हाण, यश राठोड, अभयसिंह चितळे, सचिन पवार, श्रीमती भांगरे, श्रीमती शेख, श्रीमती लोंढे, श्रीमती वाव्हळ, श्रीमती खाडे, संजय गायकवाड, प्रशांत अकोलकर, औसेकर, संजय आठरे आणि संजय शिंदे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अध्यक्षांची निवड विजय भताने सर यांनी केली.

सविस्तर वाचा : सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षिका सिंथिया फरार यांच्या समाधीचा नगरमध्ये शोध, जाणून घ्या त्यांचं कार्य

- Advertisement -


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading