Pratapgad RanSangram Lecture: गणेशोत्सवानिमित्त प्रतापगडाच्या रणसंग्रामावर प्रेरणादायी व्याख्यान - Rayat Samachar

Pratapgad RanSangram Lecture: गणेशोत्सवानिमित्त प्रतापगडाच्या रणसंग्रामावर प्रेरणादायी व्याख्यान

‘शिवरायांचा प्रतापगडाचा रणसंग्राम’ विषयावर शिवव्याख्याते अभय जावळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

rayatsamachar
1 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

पाथर्डी | २३.९ | पंकज गुंदेचा

Pratapgad RanSangram Lecture: श्री भवानी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळीमानूर येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत शिवव्याख्याते श्री. अभय गुलाबराव जावळे यांनी ‘शिवरायांचा प्रतापगडाचा रणसंग्राम’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आपल्या प्रभावी व्याख्यानातून श्री. जावळे यांनी प्रतापगडावरील रणसंग्रामातील विविध प्रसंग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यातून मिळणाऱ्या जीवनमूल्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. जबाबदारीची जाणीव, प्रामाणिकपणा, योग्य नियोजन, प्रसंगावधान आणि ध्येयपूर्तीची जिद्द या गुणांचे महत्त्व त्यांनी विविध दाखले व उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.

- Advertisement -

Pratapgad RanSangram Lecture

इतिहासातील प्रसंग जिवंतपणे मांडत त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या ओघवत्या शैलीत खिळवून ठेवले. शिवचरित्रातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि नियोजन या मूल्यांचा अंगीकार करावा, असा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक श्री. शिवाजी लवांडे यांनी प्रास्ताविक केले. व्याख्यानानंतर विद्यालयाचे प्राचार्य श्री. देविदास सोनटक्के यांच्या हस्ते शिवव्याख्याते श्री. अभय जावळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. गुंजकर यांनी मानले.

 

या व्याख्यानामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यासोबतच त्यांच्या जीवनातील नियोजन, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी या मूल्यांची प्रेरणादायी शिकवण मिळाली.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading