Cynthia Farrar: सिंथिया फॅरार यांच्या कबरीवर नाशिक धर्मप्रांताच्या वतीने पुष्पांजली व प्रार्थना - Rayat Samachar

Cynthia Farrar: सिंथिया फॅरार यांच्या कबरीवर नाशिक धर्मप्रांताच्या वतीने पुष्पांजली व प्रार्थना

rayatsamachar
2 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

अहिल्यानगर | २१.१० | रयत समाचार

Cynthia Farrar: बुऱ्हाणनगर येथील ब्रिटिश वॉर सिमेटरीमध्ये विसावा घेत असलेल्या थोर समाजसेविका, शिक्षिका आणि अमेरिकन मराठी मिशनच्या मिशनरी मदर सिंथिया फॅरार यांच्या कबरीवर नाशिक धर्मप्रांत, चर्च ऑफ नॉर्थ इंडिया (CNI) यांच्या वतीने पुष्पांजली अर्पण करून प्रार्थना करण्यात आली.

या ऐतिहासिक कबरीचा शोध अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाच्या सदस्यांनी लावला होता. यावेळी उपस्थित सर्व धर्मगुरूंनी इतिहासप्रेमी मंडळाच्या सदस्यांचे आभार मानले आणि या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व समाजासमोर आणल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच, या कबरीचे जतन व संवर्धन करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही धर्मगुरूंनी दिली.

Cynthia Farrar

यावेळी नाशिक धर्मप्रांताचे उपाध्यक्ष रेव्ह. अनिल वंजारे (इमॅन्युएल चर्च, नेवासा), धर्मप्रांत कार्यकारिणी सदस्य रेव्ह. सतीश तोरणे (अहमदनगर पहिली मंडळी, CNI), ज्येष्ठ धर्मगुरू रेव्ह. जे. आर. वाघमारे (पवित्र नामाचे देवालय, भानसहिवरे), रेव्ह. रजनीकांत साळवे (फेअरबँक मेमोरियल चर्च, वडाळा मिशन), रेव्ह. विश्वास चक्रनारायण (सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च, गोंधवणी), रेव्ह. मार्टिन पारधे (क्राइस्ट चर्च, वाळकी), रेव्ह. रजनीकांत गायकवाड (सेंट अँब्रोस चर्च, खडांबे), रेव्ह. मिखाईल लोखंडे (सेंट जॉन चर्च, पाथर्डी), धर्मप्रांताचे ज्येष्ठ धर्मगुरू रेव्ह. डी.डी. सोनवणे आणि समाजसेवक निलेश बनसोडे आदी उपस्थित होते.

Cynthia Farrar

- Advertisement -

स्त्रीशिक्षण, समाजसेवा आणि मिशनच्या शैक्षणिक कार्याशी संबंधित ऐतिहासिक वारशाचे स्मरण करणे, त्याचे दस्तऐवजीकरण करणे आणि पुढील पिढ्यांसाठी त्याचे संवर्धन करणे, ही या उपक्रमामागील महत्त्वाची भावना आहे.

इतिहासप्रेमी मंडळाने पुढाकार घेऊन या ऐतिहासिक कबरीचा शोध लावला आणि धर्मगुरूंनी तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त केला, ही इतिहास जतन करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब आहे.

सविस्तर वाचा :

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading