Ad imageAd image

Cultural Politics | ‘वैदिकीकरण’ ही प्रवृत्ती वारंवार डोके वर का काढते आहे, संजीव सोनवणी यांचा सवाल 

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

संस्कृतीवार्ता | १६.६ | संजय सोनवणी

(Cultural Politics) वैदिक हे हिंदू संस्कृतीचे मारेकरी आहेत आणि आताचे सरकार हिंदूविरोधी आहे हे वारंवार सिद्ध झालेले आहे. अभ्यासक्रमातील बदल, पुरातत्वाशीही करत असलेली बेईमानी ही त्याची दृश्य रूपे आहेत.

(Cultural Politics) NCERT च्या नववीच्या पुस्तकात हडप्पाकालीन मूर्तीमधील नृत्य करणारी युवती नग्न आहे हे दिसू नये, यासाठी तिच्या प्रतिमेत छातीखालचा भाग अस्पष्ट केला आहे. तिचे मुळचे नग्न रूप विद्यार्थ्यांना दिसू नये,असला दिव्य विचार NCERT ने केलेला आहे. पण ही सांस्कृतिक इतिहासाशी बेईमानी आहे.

(Cultural Politics) भारतात लिंगपूजा आणि योनीपुजा आजही होते आणि पुरातनकाळातही होत होती. ही डान्सिंग गर्लची प्रतिमा मुळात तंत्रशास्त्रातील आहे असे मत अनेक पुरातत्व विद्वान करत असतात आणि अशी नग्नता भारतात असंख्य शैव मंदिरात प्रतीकात्मक रीत्या चितारली वा खोदलेली आपल्याला दिसते. खजुराहो आणि मार्कंडा मंदिर याची उदाहरणे आहेत.
ही मूर्ती पुरातन शिल्पशास्त्रातील सौंदर्याचे एक मूर्तीमंत उदाहरण मानले जाते. या प्रतिमेत योनी ठळक असल्याने ती मातृदेवता असू शकेल असेही अनेक पुरातत्वविदांचे म्हणणे आहे. ते काहीही असले तरी ती मूर्ती सिंधुकालीन जीवनपद्धतीचे, सौंदर्यदृष्टीचे उत्कृष्ठ उदाहरण आहे.
नग्नतेची एवढी लाज वाटत असेल तर या मूर्तीचे चित्रच का ठेवता? काढून टाका ते पुस्तकातून. पण त्या चित्राला धूसर करून तुम्ही कोणते ज्ञान विद्यार्थ्यांना देऊ पाहताय?
NCERT ने अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतल्यावर पुस्तकाच्या डिजिटल आवृत्तीत मूळ चित्र प्रसिद्ध केले असले तरी छापील आवृत्तीत नंतर करू, असे त्यांचे म्हणणे आहे.
मुळात हा शहाजोगपणा का केला गेला? वैदिकीकरण करण्याची ही प्रवृत्ती वारंवार डोके वर का काढते आहे, याचे सर्वांनीच विचार करावा.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading