मुंबई | २५.६ | गुरुदत्त वाकदेकर
काळाचौकी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सोमवारी ता. २२ जून २०२६ रोजी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. काळाचौकी पोलीस ठाणे येथे पार पडलेल्या Police Medical Camp उपक्रमाला पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा
पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन, प्राथमिक तपासणी आणि आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने Police Medical Camp शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरादरम्यान विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग नोंदवत कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली तसेच आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला.
Police Medical Camp शिबिरात डॉ. प्रागजी वाजा, डॉ. वैशाली शेलार, डॉ. सुनीता निकम, डॉ. शशिकांत पवार, डॉ. अजय पुरी, डॉ. मुकुंद धोत्रे, डॉ. गुलाब गुप्ता आणि डॉ. रोहन राम ठाकूर यांनी वैद्यकीय सेवा दिली. पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे, विभागीय नगरसेविका सुप्रिया दळवी आणि मनसेच्या पदाधिकारी ग्रेसी सिंग यांची उपस्थिती लाभली. तसेच महिला पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस उपनिरीक्षक सागर बनकर तसेच सपोनि हसन मुलाणी हेही उपस्थित होते.
हे ही वाचा : Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय निगडकर यांचे विशेष सहकार्य लाभले. या वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन, तपासणी आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देण्यात आला. पोलीस दलाच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित झाले.
दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे शिबिर केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित न राहता, पोलीस दलासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य-जागरूकतेचा महत्त्वाचा उपक्रम ठरला.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



