Culture | नीला भागवत स्मृतींना उजाळा; २५ एप्रिलला ‘समांतर’ माहितीपटासह भावपूर्ण अभिवादन सोहळा - Rayat Samachar

Culture | नीला भागवत स्मृतींना उजाळा; २५ एप्रिलला ‘समांतर’ माहितीपटासह भावपूर्ण अभिवादन सोहळा

rayatsamachar
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | २४.४ | गुरूदत्त वाकदेकर

(Culture) प्रख्यात गायिका, विचारवंत आणि सामाजिक भान जपणाऱ्या कलावंत नीला भागवत यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबईत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून आयोजित हा सोहळा शनिवारी ता. २५ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान पार पडणार आहे.

(Culture) दादर (पश्चिम) येथील प्रभादेवी परिसरातील रवींद्र नाट्य मंदिर, पी.एल. देशपांडे कला अकादमीच्या ५ व्या मजल्यावरील न्यू मिनी थिएटर येथे हा कार्यक्रम होईल. यानिमित्त धनंजय भावळेकर यांनी दिग्दर्शित ‘समांतर’ या नीला भागवत यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

(Culture) माहितीपटानंतर त्यांच्या सहकाऱ्यांकडून, विद्यार्थ्यांकडून आणि विविध क्षेत्रातील कलाकारांकडून नीला भागवत यांच्याशी निगडित आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. त्यांच्या संगीत, विचार आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा जपणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
उदारपणे, निडरपणे जगलेल्या जीवनाचा उत्सव या भावनेतून साकारलेला हा सोहळा सर्वांसाठी खुला असून, कला व सामाजिक भान जपणाऱ्या प्रत्येकासाठी तो प्रेरणादायी ठरणार आहे. गुगल स्थळ नकाशा – https://maps.app.goo.gl/8FK21Gn29BVgHppU6?g_st=ac⁠�

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading