नागपूर | २०.५ | रयत समाचार
(Literature) सुरेश द्वादशीवार यांच्या नव्या पुस्तकातील ‘तत्त्वज्ञान आणि फिलॉसॉफी हे समानार्थी शब्द नाहीत’ या ठाम मांडणीमुळे बौद्धिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. श्रद्धा, धर्म, तर्क, ज्ञान आणि आधुनिक विचारप्रवाह यांचा वेध घेणाऱ्या त्यांच्या नव्या लेखनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात एका विशेष जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ‘आपले धर्मशास्त्र आणि आपली फिलॉसॉफी’ या विषयावर प्रा. द्वादशीवार यांचे व्याख्यान रविवारी ता. २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शंकरनगर येथील बाबुराव धनवटे सभागृह येथे होणार आहे. यावेळी त्यांच्या नव्या पुस्तकांचेही लोकार्पण करण्यात येईल.
(Literature) प्रा. द्वादशीवार यांनी आपल्या पुस्तकात ‘तत्त्वज्ञान’ आणि ‘फिलॉसॉफी’ यांतील मूलभूत भेद अधोरेखित केला आहे. त्यांच्या मते, तत्त्वज्ञान हे श्रद्धा, ईश्वर व आध्यात्मिक अनुभूतीच्या मार्गाने जाणारे आहे, तर फिलॉसॉफी ही तर्क, धर्मनिरपेक्षता आणि ज्ञानाच्या शोधाची वाट चोखाळणारी विचारपद्धती आहे. ‘तत्त्वज्ञानाची दिशा माघारी नेणारी, तर फिलॉसॉफीची पुढे नेणारी असते, अशी ठळक भूमिका त्यांनी मांडली आहे.
(Literature) कार्यक्रमाचे आयोजन प्रगतीशील लेखक संघ यांनी केले असून मनोविकास प्रकाशन आणि श्रीविद्या प्रकाशन यांचे सहकार्य लाभले आहे. विचारवंत, साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि अभ्यासकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले.
India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
