India news | लडाखमधील सोनम वांगचूक यांच्या मृत्यूचा दावा ‘डीपफेक’; लष्करप्रमुखांचा व्हिडिओही एडिटेड

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई | २९.११ | रयत समाचार

(India news) सोशल मीडियावर लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा दावा करणारे काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, हे सर्व व्हिडिओ पूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे क्लिप्स ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले डीपफेक असल्याची पुष्टी अधिकृत पातळीवर करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागाने प्रसिद्ध केली आहे.

(India news) दरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. मात्र तपासाअंती हेही फुटेज एडिटेड असल्याचे समोर आले आहे. मूळ व्हिडिओमध्ये लष्करप्रमुख लष्करी सज्जता आणि सुरक्षा परिस्थिती याबाबत बोलत आहेत; सोनम वांगचूक यांच्याबाबत ते कोणतेही विधान करत नाहीत.

(India news) सध्याच्या घडीला या भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या डीपफेक व्हिडिओंचा प्रसार थांबवण्याचे आवाहन अधिकृत सूत्रांनी केले असून नागरिकांनी कोणतीही माहिती तपासूनच प्रसारित करावी, असेही स्पष्ट केले आहे.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading