अहमदनगर | २९.११ | रयत समाचार
(Election) नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १, २ आणि ३ डिसेंबर २०२५ या तीन दिवसांना ‘कोरडा दिवस’ जाहीर केला आहे.
(Election) अहिल्यानगर जिल्ह्यात ता. २ डिसेंबर रोजी ११ नगरपरिषदांसह नेवासा नगरपंचायतीचा मतदानाचा कार्यक्रम असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदानापूर्वीचा दिवस, मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस असे तीनही दिवस सर्व प्रकारची मद्य, ताडी आणि अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
(Election) या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र मद्यनिषेध व अबकारी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



