Amc election: प्रभाग क्र. ७ मधील एसटी आरक्षण रद्द न करण्याची मागणी

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्य की जय हो
  • Amc election

अहमदनगर | २९.११ | रयत समाचार

Amc election: आगामी महानगरपालिका 2025 सार्वत्रिक निवडणुकांत प्रभाग क्र. ७ (सावेडी नाका–भुतकरवाडी) हा अनुसूचित जमात (एसटी) आरक्षित प्रभाग घोषित झाला आहे. मात्र काही व्यक्तींनी या प्रभागात एसटी समाजाचे उमेदवार नसल्याचे कारण देत एसटी आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा भिल्ल असोसिएशनतर्फे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष सुनील माणिकराव ठाकरे यांनी निवेदनात स्पष्ट केले की, प्रभाग क्र. ७ मध्ये सावेडी नाका परिसरात भिल्ल समाजाची कुटुंबे, मतदार तसेच निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत.

 

Public issue | बळजबरीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे गुपीत; सिमेंट कंपन्यांच्या लाभासाठी पब्लिकच्या माथी सिमेंट प्रदूषण

निवेदनानुसार या प्रभागात ३०० ते ३५० एसटी भिल्ल मतदार असून समाजातील अनेक जण उमेदवारीसाठी सिद्ध आहेत. त्यामुळे “उमेदवार नाही” या कारणावरून आरक्षण रद्द करण्याची मागणी पूर्णपणे आधारहीन असल्याचे असोसिएशनने अधोरेखित केले.

 

भिल्ल समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व अबाधित राहावे, तसेच प्रभाग क्र. ७ ला मिळालेले एसटी आरक्षण कायम ठेवावे, अशी मुख्य मागणी निवेदनातून मनपेकडे करण्यात आली.

 

निवेदन देताना जिल्हा भिल्ल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील ठाकरे यांच्यासह राम शिंदे, भरत खाकाळ, भाऊसाहेब फुलपगारे, सुभाष गोलवड, पोपट गोलवड, चंद्रकांत माळी, दत्तात्रय गोलवड, ज्ञानेश्वर गोलवड, गोरख बनकर, रवि गोलवड आदी सदस्य उपस्थित होते.

 

हे हि वाचा: Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading